गुजरातमध्ये माथेफिरु कारचालकाची पोलिसालाच धडक

गुजरातमध्ये एका माथेफिरु कारचालकाने थेट पोलिसालाच धडक दिल्याची घटना समोर आलीय. गुजरातच्या बनासकांठामध्ये ही घटना घडलीय. रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरु असताना हा सगळा प्रकार घडला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 10, 2018, 05:33 PM IST
गुजरातमध्ये माथेफिरु कारचालकाची पोलिसालाच धडक title=

अहमदाबाद : गुजरातमध्ये एका माथेफिरु कारचालकाने थेट पोलिसालाच धडक दिल्याची घटना समोर आलीय. गुजरातच्या बनासकांठामध्ये ही घटना घडलीय. रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरु असताना हा सगळा प्रकार घडला आहे. 

बनासकांठा इथल्या महामार्गावर हा कारचालक भरधाव वेगाने चेकनाक्याच्या दिशेने आला. यावेळी या कारचालकाला रोखण्याचा पोलीस कॉन्स्टेबलने प्रयत्नही केला. मात्र त्या कारचालकाने तिथे थांबण्याऐवजी पोलिसालाच धडक देत तिथून पोबारा केला. 

ही धडक इतकी भीषण होती की तो पोलीस यांत गंभीर जखमी झालाय. हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. जखमी पोलिसाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या  माथेफिरु कारचालकाला शोधण्यासाठी बनासकांठा पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आलाय.