घरात घुसले, नव्या नवरीला उचलून बाईकवर बसवले आणि... लग्नाच्या दुसऱ्या दिवशी महाभयंकर ड्रामा

लग्नाच्या दुस-याच दिवशी नव्या नवरीला घरातून पळवून नेले. कृत्य करणारे कोण होते? समजल्यावर पोलिसांना धक्का बसला. 

वनिता कांबळे | Updated: Jun 6, 2023, 04:59 PM IST
घरात घुसले, नव्या नवरीला उचलून बाईकवर बसवले आणि... लग्नाच्या दुसऱ्या दिवशी महाभयंकर ड्रामा title=

Bihar Crime News : बिहारमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दुस-याच दिवशी नव्या नवरीला घरातून पळवून नेले आहे. या नवरीला पळवून नेणारे थेट घरात घुसले आणि नवरीला उचलून बाईकवर आणून बसवले. यानंतर तिला घेऊन ते फरार झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी महाभयंकर ड्रामा झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या नवरीला पळवून नेणारे कोण आहेत? यांचे नवरी सोबतचे नाते काय आहे? हे समजल्यावर पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे (viral  video). 

एक जण घराबाहेर बाईक घेऊन थांबला होता

बिहारमधील अररिया गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दुस-याच दिवशी नव्या नवरीला जबरदस्तीनं तिच्या घरात जाऊन उचलण्यात आलं. ती ओरडत होती, तरीही तिला अक्षरशः उचलून बाईकवर बसवण्यात आलं. एक जण घराबाहेर बाईक घेऊन थांबला होता. दुसरा तिला घरातून उचलून घेऊन आला. यानंतर या नवरीला बाईकवरुन घेऊन हे दोघेजण फरार झाले. यावेळी घराबाहेर अनेक लोक होते. पण, सगळे बघत राहिले आणि जीवाच्या आकांतानं ओरडणा-या या नवरीला उचलून नेण्यात आलं. मात्र, कुणीही यांना रोखले नाही.  

आंतरजातीय विवाह केला म्हणून शिक्षा

या नवरीला घरातून उचलून नेणारे दुसरे तिसरे कुणी नव्हते तर तिचे भाऊच होते. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या भावांनी हे कृत्य केले आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून या नवविवाहितेला तिच्याच भावांनी जबरदस्तीनं तिच्या सासरच्या घरातून उचलून नेले. 

व्हिडिओ व्हायरल

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून नवरीचे भाऊ आणि तिच्या काही नातेवाईकांनी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हे धक्कादायक कृत्य केले. यांनी थेट नवरीला तिच्या सासरच्या घरातून उचलून नेले. नवरीला घरातून उचलून नेल्याचा आणि बाईकवर बसून पळ काढल्याचा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.