भारतात मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवणं गुन्हा नाही; Necrophilia वर न्यायालय काय म्हणतंय?

भारतीय दंड संहितेअंतर्गत मृतदेहासोबत लैंगिक अत्याचार हा बलात्कार किंवा अनैसर्गिक गुन्हा नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. Necrophilia म्हणजे काय आणि मृतदेहासोबत सेक्स करण्याबाबत भारतीय कायदे काय सांगतात? 

Updated: Jun 6, 2023, 04:37 PM IST
भारतात मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवणं गुन्हा नाही; Necrophilia वर न्यायालय काय म्हणतंय? title=
having sex with dead body not an offence in india what is necrophilia what indian laws say

What is Necrophilia : मृतदेह हे बोलू शकत नाही किंवा विरोध करु शकत नाही. अशावेळी त्यांच्याबद्दल बोलण्याचं काम जिवंत लोक करतात. एका धक्कादायक बाब म्हणजे भारतीय दंड संहितेअंतर्गत मृतदेहाचे लैंगिक अत्याचार हे बलात्कार किंवा अनैसर्गिक गुन्ह्यांच्या कक्षेत येत नाहीत, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय दिला आहे. नेक्रोफिलियाला भारतात बलात्कार मानला जात नाही. काय आहे Necrophilia आणि भारतीय कायदे याबद्दल काय सांगतात? याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. 

काय आहे प्रकरण ? 

कर्नाटक उच्च न्यायालयात 25 वर्षीय महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबत बलात्कार करण्यात आला होता. त्याबद्दल आरोपीला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात केस उभी केली होती. या प्रकरणाचा निकाल देताना कर्नाटक न्यायालयाने त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात न्यायालयात सांगण्यात आलं की, "दुर्दैवाने भारतात महिलांच्या मृतदेहाविरुद्ध सन्मान राखण्यासाठी आणि अधिकारांचं संरक्षण, गुन्हेगारीच्या उद्देशाने IPC च्या तरतुदींसह कोणतेही विशिष्ट कायदे लागू करत आलेले नाहीत".

नेक्रोफिलिया म्हणजे काय ?

25 वर्षीय महिलेची हत्यासंदर्भात मात्र त्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले मात्र बलात्काच्या आरोपातून त्याची मुक्तता करण्यात आली. नेक्रोफिलिया हा एक ग्रीक शब्द असून नेक्रो म्हणजे मृतदेह असा अर्थ होतो. तर फीलिया म्हणजे प्रेम...या अर्थातून मृतदेहाबरोबर संबंध प्रस्थापित करुन आनंद मिळवणे, असा होता. वासनांधांकडून मतृदेहावर बलात्कार करण्याचे प्रमाण केल्या काही काळात वाढले आहेत. 

अनेक सरकारी आणि खाजगी रुग्णालयांच्या शवागारात मतदेहांसोबत लैंगिक संभोग करण्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. त्यानंतर अनैसर्गिक लैंगिक संबंधाच्या गुन्ह्याच्या व्याख्येनुसार भारतीय दंड संहितेत सुधारणा करण्याची किंवा नवीन तरतूद आणण्याची मागणी जोर धरत आहे. (having sex with dead body not an offence in india what is necrophilia what indian laws say)

महिलेच्या मृतदेहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि असे गु्न्हे घडू नयेत याची काळजी घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे, असं निरीक्षण न्यायमूर्ती बी वीरप्पा यांनी नोंदवली आहे. 

'या' देशांमध्ये नेक्रोफिलिया हा गुन्हा आहे

नेक्रोफिलिया या गुन्ह्यात हा यूकेमध्ये 6 महिन्यांपासून ते 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा दिली जाते. कॅनडामध्ये शिक्षा ही पाच वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवासाची आहे. न्यूझीलंडमध्ये दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. दक्षिण आफ्रिकेत नेक्रोफिलियाला हा गुन्हा आहे. 

मृत्यूनंतरही मानवी प्रतिष्ठेचा अधिकार आणि सन्मान अभादित राहण्यासाठी नेक्रोफिलिया हा गुन्हा भारतातही करणं गरजेचं आहे.