नवी दिल्ली : ज्यांच्याकडे आधार नंबर नाही, अशा आयकर दात्यांना यंदाही आयकर परतावा भरता येणार आहे. सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यात १३९ अ कलमाअंतर्गत परताव्यासाठी आधार नंबर सक्तीचा केला होता. पण सर्वोच्च न्यायलयानं या कलमाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
आधार सक्तीचं करणाऱ्या सरकारच्या नियमांविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सुनावणी सुरु आहे. या सुनावणीवर घटनापीठ जोपर्यंत निर्णय देत नाही, तोपर्यंत आयकर कायद्यातील कलम १३९ अअ लागू करु नये असा सर्वोच्च न्यायालायचा निर्णय आहे. यामुळे सालाबाद प्रमाणे यंदाही आयकर परतवा भरताना तुमचा पॅन नंबर पुरेसा असणार आहे.