आधार कार्डबाबत महत्वाची माहिती, अधिक जाणून घ्या

 Aadhaar card : आधार कार्डबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

Updated: Jan 20, 2022, 11:33 AM IST
आधार कार्डबाबत महत्वाची माहिती, अधिक जाणून घ्या title=

मुंबई :  Aadhaar card : आधार कार्डबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. आता यापुढे स्मार्ट आधार कार्ड उपयोगी ठरणार नाही. कारण ते अवैध ठरविण्यात आले आहे. त्यामुळे मूळ आधार कार्ड कसे मिळवायचे ते जाणून घ्या.

आधार कार्डची निर्मिती करणाऱ्या ‘युनिक आयडेंडिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’अर्थात यूआडीएआयने याबाबत मोठी स्पष्टीकरण दिले आहे. स्मार्ट आधार कार्ड हे अवैध असणार आहे. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या प्रकारात बनविलेले स्मार्ट आधार कार्ड आता ग्राह्य धरले जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात आधार नोंदणी केली जात आहे. बाजारातून तयार केलेले स्मार्ट आधार कार्ड तयार करुन घेण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. मात्र, असे कार्ड्स आता चालणार नाहीत, असे स्पष्टीकरण यूआडीएआयने दिलेले आहे. आधार प्राधिकरणाने सोशल मीडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

आधार कार्डाचे रुपांतर स्मार्ट कार्डमध्ये केल्यामुळे त्यामध्ये सुरक्षाविषयक अनेक त्रुटी राहतात. अशा कार्डमध्ये सुरक्षाविषयक फीचर नसते. त्यामुळे आम्ही अशा स्मार्ट आधार कार्डाला अवैध घोषित करत आहोत, असे आधार प्राधिकरणाने म्हटले आहे. त्यामुळे आता तुम्हाला मूळ आधार कार्डवर अवलंबून राहावे लागणार आहे.

मूळ आधार कार्डवर कोणते फीचर्स असतात? 

आधारचे पीव्हीसी कार्ड पाहिजे असेल, तर केवळ 50 रुपये भरुन आपण अधिकृतरीत्या ते मिळवू शकता. ते यूआडीएआयकडून पोस्टाने पाठविले जाईल. मूळ आधार पीव्हीसी कार्डात डिजिटली साईनड् सुरक्षित क्यूआर कोड असतो. ते छायाचित्रासह येते. त्यात लोकसांख्यिकी तपशील असतो, तसेच सर्व सुरक्षा फीचरही त्यात असतात.

असे मिळवा आधार कार्ड

-  मूळ आधार कार्ड प्राधिकरणाच्या https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटच्या मदतीने प्राप्त करू शकता.

- या साइटवर गेल्यानंतर ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ या पर्यायावर क्लिक करा.

-  12 अंकी आधार क्रमांक अथवा 28 अंकी नोंदणी आयटी टाका. सुरक्षा कोड भरा. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. त्यानंतर अटी व शर्ती स्वीकृत करा.

- OTP पडताळणीस सबमिट बटन दाबल्यानंतर ‘पेमेंट ऑप्शन’ दिसेल. तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंग याद्वारे पैसे अदा करु शकता. पैसे अदा झाल्यानंतर पावती मिळेल आणि कार्ड पोस्टाने घरपोच येईल.