Weather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार

Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Updated: Dec 5, 2022, 08:27 AM IST
Weather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार  title=
IMD Weather Update Today winter wave latest marathi news

Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं अनेकांनाच धडकी भरली आहे. बंगालच्या खाडी भागात दक्षिण पूर्व आणि अंदमानच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं 8 डिसेंबरला पुद्दुचेरी आणि तामिळनाडू मध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आएमडीनं दिलेल्या माहितीनुसार यावेळी पावसासोबतच सोसाट्याचे वारेही वाहणार आहेत. (IMD Weather Update Today winter wave latest marathi news )

नोव्हेंबरमध्ये सक्रीय नसणारा पूर्वोत्तर मान्सून इतर राज्यांमध्ये झालेल्या कमी पर्जन्यमानामुळं ती उणिव या महिन्यात भरून काढताना दिसणार आहे. बंगालचा उपसागर आणि खाडी भागामध्ये सातत्यानं बदलणाऱ्या हवामानामुळं डिसेंबर महिन्यात देशातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये किनारपट्टी भागाला पाऊस झोडपणार असल्याचं सांगण्यात आलं. 

कमी दाबाच्या पट्ट्यामुळं कुठवर पोहोचणार पाऊस? 

हवामान तज्ज्ञांनुसार 5 डिसेंबरपर्यंत दक्षिण पूर्वेला असणारी बंगालची खाडी आणि त्यालाच लागून असणाऱ्या अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. 7 डिसेंबरपर्यंत हा पट्टा आणखी सक्रीय होणार असून, पश्चिम आणि उत्तर पश्चिमेच्या दिशेनं पुढे जाईल. परिणामी तामिळनाडूमध्ये पावसाची जोरदार हजेरी दिसणार आहे.

हेसुद्धा वाचा : Petrol-Diesle च्या वाढत्या किमतीबाबत मोठी बातमी, जाणून घ्या नवे दर 

देशात कुठे वाढणार थंडीचा कडाका? 

एकिकडे देशाच्या एका टोकाला पावसाची चिन्हं असतानाच दुसरीकडे उत्तरेला असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतानाच दिसत आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसारख्या भागांमधल बहुतांश ठिकाणांवर बर्फवृष्टी होताना दिसत आहे. याचे थेट परिणाम देशातील काही भागांवरही दिसून येत आहे. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह इतरही भागांमध्ये निचांकी तापमानाची नोंद करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

इथे महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरडे वारे वाहणार असून, त्यामुळं थंडीचं वाढतं प्रमाण जाणवणार आहे. असं असलं तरीही मुंबई आणि कोकणात अंशत: ढगाळ वातावरण असणार आहे. निफाड, सातारा, नागपूर या भागांमध्ये थंडीचा कडाका कायम असणार आहे.