Petrol-Diesle च्या वाढत्या किमतीबाबत मोठी बातमी, जाणून घ्या नवे दर

Petrol-Diesle Price: वाढत्या महागाईतच इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघत होती, त्यातच पेट्रोल-डिझेलमध्ये (petrol diesel price) सातत्याने होणारी वाढ बघता इंधन दरवाढीवरुन अक्षरशः संताप व्यक्त करत होते. जर तुम्हीही गाडी चालवत असाल तर तुमच्यासाठी पेट्रोल-डिझेलची नवीनतम किंमत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

Updated: Dec 5, 2022, 07:56 AM IST
Petrol-Diesle च्या वाढत्या किमतीबाबत मोठी बातमी, जाणून घ्या नवे दर   title=
Petrol-Diesel Price Today price in maharashtra

Petrol-Diesel Price Today 5th December 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही भारतीय बाजारात तेलाच्या किमतीत (Oil prices in the Indian market) फारसा बदल झालेला नाही. देशातील प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमतीत सहा महिन्यांहून अधिक काळ कोणताही बदल झालेला नाही. या दरम्यान अनेक ठिकाणी तेलाच्या किमतीत काही प्रमाणात बदल झाला असला तरी देशातील चार महानगरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जवळपास सहा महिन्यांपासून बदलले नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये तेलावरील व्हॅट (VAT on oil) कमी करण्यात आला. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा (Petrol-Diesel rate) आढावा घेतात आणि त्यानंतर नवीन दर जारी करतात. सरकारी तेल कंपनी IOCL ने आजचे नवीनतम दर जारी केले आहेत. यामध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. 

वाचा : वर्षाच्या अखेरच्या दिवशी बदलणार 'या' राशींचं भविष्य; नोकरी आणि नात्यांवर होणार मोठे परिणाम 

1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती?

- दिल्लीत पेट्रोल 96.76 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.29 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.09 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.62 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

या भागात पेट्रोल-डिझेलचे दर अधिक 

काही ठिकाणी तेलाच्या किमतीत किरकोळ बदल दिसून आले. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोलची किंमत 6 पैशांनी कमी होऊन 96.94 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3 पैशांनी कमी होऊन 90.11 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. त्याच वेळी, झियाबादमध्ये पेट्रोल 18 पैशांनी कमी झाले आणि 96.40 रुपये प्रति लिटर विकले गेले. तर डिझेल 17 पैशांनी घसरून 89.58 रुपये प्रति लीटर झाले. यूपीची राजधानी लखनऊमध्ये आज पेट्रोलचे दर 5 पैशांनी घसरून 96.57 रुपये प्रति लिटरवर आले आहेत. तर डिझेल 5 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.