IKIO Lighting Limited IPO: IKIO Lighting Limited कंपनीचा आयपीओ हा 6 जून 2023 रोजी गुंतवणूकदारांसाठी सुरू होतो आहे. याची प्राईस बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर सेट केली जाणार आहे. ₹270 - ₹285 चा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर असून त्याचे दर्शनी मूल्य (फेस वॅल्यू) ₹ 10 प्रत्येकी इक्विटी शेअर्स इतकी असेल. या आयपीओची ऑफर उघडण्याची तारीख ही मंगळवार 6 जून, 2023 आणि ऑफरची शेवटची तारीख ही गुरुवार 8 जून 2023 पर्यंत असेल. या आयपीओचा किमान बिड लॉट 52 इक्विटी शेअर्स आहे तसेच फ्लोअरची किंमत इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 27 पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 28.5 पट आहे.
IKIO Lighting Limited ही भारतातील लाइट एमिटिंग डीयोड (LED) लाइटिंगच्या उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी किंमत बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर (चेस दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10) निश्चित केली आहे. कंपनीचा आयपिओ हा वर म्हटल्याप्रमाणे मंगळवार, 6 जून, 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, 8 जून, 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 52 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 52 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. तेव्हा ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे.
प्रति इक्विटी शेअर ₹ 10 चे दर्शनी मूल्य असलेल्या ऑफरमध्ये ₹ 350 कोटी पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि विद्यमान भागधारकांद्वारे 9,000,000 इक्विटी शेअर्सची ऑफर-फॉर-सेल (OFS) असते.
या कंपनीनं ग्राहकांसाठी उत्पादन, मग त्यांचे डिझाईन आणि मग पुरवठा करते. या कंपनीच्या उत्पादनांचे वर्गीकरण हे LED लाइटिंग, रेफ्रिजरेशन लाइट्स, ABS (ऍक्रिलोनिट्रिल ब्युटाडीन स्टायरीन) पाइपिंग आणि इतर उत्पादने यामध्ये केले जाते. कंपनीने उत्पादित केलेली उपकरणे आणि प्रणाली ही निवासी, औद्योगिक आणि कर्मशियल लाइटिंगसाठी विविध उद्योगांमध्ये वापरली जातात.
IKIO Lightning Signify Innovations India Limited पूर्वी ही कंपनी 'फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड' म्हणून ओळखली जात होती. आर्थिक वर्ष 2022 मध्ये, भारताच्या 'एलईडी स्पॉटलाइट्स', 'एलईडी डाउनलाइट्स' आणि 'कोव्ह लाइट्स'च्या क्षेत्रात या कंपनीचा 50% बाजार हिस्सा होता. F&S अहवालानुसार, भारतातील 'झूमर', 'भिंतीवरील दिवे', 'पेंडंट', 'बाहेरील दिवे' या वस्तू उत्पादकाच्या क्षेत्रात कंपनीचा वाटा 10% आहे. कंपनीकडे उद्योग क्षेत्र आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण कस्टमर सपोर्ट आहे ज्यात 'वेस्टर्न रेफ्रिजरेशन प्रायव्हेट लिमिटेड', 'पॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटे'ड आणि 'नोव्हेटॉर इलेक्ट्रिकल अँड डिजिटल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड' यांचा समावेश आहे.
IKIO Lighting Limited चा प्रोफॉर्मा कन्सोलिडेटेड आधारावरील ऑपरेशन्समधील महसूल (Revenue) 55.47% ने वाढून आर्थिक वर्ष 2021 च्या हिशोबानं ₹ 213.45 कोटींवरून 2022 मध्ये ₹331.84 कोटी झाला आहे आणि करानंतरचा नफा 75.37% ने वाढून तो ₹ 28.81 वरून 2021 मध्ये ₹ 50.52 कोटी इतका वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये प्रोफॉर्मानुसार, डिक्सन टेक्नॉलॉजीज (19.08%), अंबर एंटरप्रायझेस (6.30%), Syrma SGS तंत्रज्ञान (10.29%) आणि Elin Electronics (12.93%) सारख्या सूचीबद्ध केलेल्या काही समवयस्क कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ मूल्यावर परतावा (RoNW) 46.40% इतका आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी, प्रोफॉर्मा एकत्रित आधारावर, कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल ₹ 328.63 कोटी होता आणि करानंतरचा नफा ₹ 51.35 कोटी होता.
प्राइस बँडमध्ये कोणतीही सुधारणा झाल्यास, ऑफर कालावधी 10 Working Days पेक्षा जास्त नसलेल्या ऑफर कालावधीच्या अधीन असेल. किंमत बँडमध्ये अशा सुधारणेनंतर किमान कालावधी तीन Extra Working Days नं वाढवला जाईल. फोर्स मेजाऊर , बँकिंग स्ट्राइक किंवा तत्सम परिस्थितींमध्ये, कंपनी, बुक रनिंग लीड मॅनेजरशी सल्लामसलत करून, लिखित स्वरुपात नोंदणींसाठी ऑफर कालावधी किमान तीन Working Days साठी वाढवू शकते. बिड/ऑफर कालावधी 10 Working Days पेक्षा जास्त नसावा. प्राइस बँडमधील कोणतीही सुधारणा आणि सुधारित बोली/ऑफर कालावधी लागू असल्यास स्टॉक एक्स्चेंजला अधिसूचनेद्वारे सार्वजनिक सूचना जारी करून तसेच बुक रनिंग लीड मॅनेजरच्या वेबसाइटवरील बदल सूचित करून योग्य वेळी प्रसारित केला जाईल. सिंडिकेट सदस्यांच्या टर्मिनल्सवर तसेच नियुक्त मध्यस्थांना आणि प्रायोजक बँकांना सूचित करून तो लागू केला जाईल.
ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात असून, त्यात ऑफरच्या 50% पेक्षा जास्त ऑफर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध नसतील. ऑफरच्या 15% पेक्षा कमी संस्थागत नसलेल्या बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असतील आणि ऑफरच्या 35% पेक्षा कमी किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना वाटपासाठी उपलब्ध असतील.
(Disclaimer: वरील माहिती ही प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.)