मुंबई : जर तुम्ही SBI कर्मचाऱ्याच्या वर्तवणूकीवरून नाखुश असाल तर तुम्हाला 3 पद्धतीने त्यासंबधीची तक्रार नोंदवता येते. बऱ्याचदा बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसून येते. अशावेळी ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे SBI आता आपल्या कर्मचाऱ्यांची तक्रार करण्याची सुविधा देत आहे.
टोल फ्री क्रमांकावर तक्रार
SBIच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून तुम्ही SBIच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या वर्तवणूकीबाबत नाखुश असाल तर तक्रार नोंदवू शकता. SBI कर्मचाऱ्याच्या विरोधात घरबसल्या ऑनलाइन माध्यमातूनही तक्रार नोंदवता येऊ शकते. यासाठी बँकेने टोल फ्री नंबर जारी केला आहे.
(टोल-फ्री)
1800 11 2211 ,
1800 425 3800
080-26599990
ऑनलाईन तक्रार
स्टेट बँक ऑफ इंडियाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला कोणत्याही कर्मचाऱ्याची तक्रार नोंदवायची असेल तर, https://crcf.sbi.co.in/ccf/ वर Existing customers/General Banking/Branch Related अंतर्गत तक्रार नोदवू शकता.
ईमेल करूनही तक्रार नोंदवू शकता.
बँकेच्या कर्मचाऱ्याची सविस्तर तक्रार तुम्ही
agmcustomer.lhodel@sbi.co.in या ईमेल आयडीवरही नोंदवू शकता.
तुम्ही केलेल्या तक्रारीनंतर नोडल अधिकारी संबधीत तक्रारीचे निवारण करण्यासाठी योग्य ती पावले उचलतील.