'या' बँकांमध्ये अकाऊंट असल्यास पीएफची रक्कम काढता येणार नाही

पीएफधारकासांठी (PF Holder) महत्वाची बातमी आहे.

Updated: Jun 26, 2021, 04:22 PM IST
'या' बँकांमध्ये अकाऊंट असल्यास पीएफची रक्कम काढता येणार नाही  title=

मुंबई : अडचणीच्या वेळेत नोकरदार वर्गाला पीएफ (PF) खात्यातील रक्कम कामी येते. कोरोना (Corona) काळात अनेकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. EPFO ने कोरोना काळात पैसे काढण्यासाठीची प्रक्रिया सुलभ आणि सोपी केली. पण पीएफधारकाला (PF Holder) खात्यातून पैसे काढण्यासाठी बँक अकाऊंट इपीएफसह लिंक असणं बंधनकारक असतं. सोबतच केवायसी (KYC) अपडेट असावे लागते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी अनेक बँकांचे विलिनिकरण (Merge of Bank) करण्यात आले. या विलिनिकरणानंतर ज्या खातेदारांनी खात्यात आवश्यक ते बदल केले नसतील, तर त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. (If you not update bank details after merger PF money may get stuck) 

काही सरकारी क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणानंतर त्यांचे आयएफएससी (IFSC) कोड 1 एप्रिल 2021 पासून निरुपयोगी झाले आहेत. अशा परिस्थितीत ईपीएफओ पीएफ खातेधारकांना बँकेचे तपशील अपडेट करण्यास सांगितले आहे. जुन्या बॅंक खात्यातून रक्कम काढताना पीएफधारकाला समस्या येऊ शकते. ही समस्या उद्भवू नये यासाठी इपीएफोने पीएफधारकांना ही सूचना दिली आहे. खातेधारक हे काम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करु शकतात.  
 
जर तुमचे बँक अकाउंट विलीन झालेल्या अशा बँकांमध्ये असेल, तर नवीन आयएफएससी कोड मिळवण्यासाठी जुने पासबुक आणि चेकबूक बँकेकडे जमा करावे लागतील. त्या बदल्यात बॅंकेकडून खातेधारकाला एक पासबुक (PassBook) आणि आपल्या अपडेटेड माहितीसह चेकबुक (Cheque Book) देण्यात येईल. यानंतर पीएफधारकाला इपीएफओच्या पोर्टलवर लॉगीन करुन पीएफ खात्यात बँक डिटेल्स अपडेट करावे लागेल.

ईपीएफओनुसार, आंध्र बँक (Andhra Bank), सिंडिकेट बँक(Syndicate Bank), ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank of Commerce), अलाहाबाद बँक(Allahabad Bank) युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India) आणि कॉर्पोरेशन बैंक (Corporation Bank) या बँकेचे आयएफएससी कोड (IFSC Code) रद्द करण्यात आले आहेत. यामुळे पीएफ खात्यात बदल केल्याशिवाय रक्कम काढता येणार नाही. 

संबंधित बातम्या : 

PF Account | पीएफ खात्यातील पेन्शनची रक्कम कशी काढायची? जाणून घ्या प्रक्रिया

PF Withdrawal | पीएफची रक्कम किती दिवसांनंतर खात्यात जमा होते?

EPFमधील हे 5 मोठे बदल तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या याचे फायदे