जर तुमच्याकडे 25 पैसे असतील, तर तुम्ही लोखो रुपये कमवू शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

बऱ्याच लोकांना जुन्या गोष्टी साठवून ठेवण्याची सवय असते तर काही लोकांचा तो छंद असतो.

Updated: Sep 30, 2021, 02:32 PM IST
जर तुमच्याकडे 25 पैसे असतील, तर तुम्ही लोखो रुपये कमवू शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : बऱ्याच लोकांना जुन्या गोष्टी साठवून ठेवण्याची सवय असते तर काही लोकांचा तो छंद असतो. ज्यामुळे काही लोकं आपला छंद जोपासण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. त्यामुळेच असाच जुने पैसे जमा करण्याचा छंद असल्याने काही लोकं पैसे खर्च करण्यासाठी तयार आहेत, त्यामुळे त्यांना फक्त पाहिजे असलेलं नाणं तुम्ही त्यांना देणार असाल, तर ते तुम्हाला त्यासाठी त्या नाण्याच्या मुल्यापेक्षा जास्त पैसे देण्यासाठी देखील तयार आहेत.

त्यामुळे जर तुमच्याकडे जुणी नाणी पडली असतील आणि त्याचं काय करायचं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर, तुमच्यासाठी आता चांगली बातमी आहे कारण तुम्हाला त्याच्याबदल्यात आता खूप जास्त फायदा होणार आहे.

जर तुमच्याकडे असलेल्या नाण्यांमध्ये संग्रहात 25 पैशांचे नाणे असेल, तर तुम्ही एका रात्रीत करोडपती होऊ शकता. होय, 25 पैशांच्या नाण्याने तुम्ही रातोरात करोडपती होऊ शकता.

अनेक ऑनलाइन साईट्स नाणी विकत आहेत किंवा त्यावरुन विकत घेतली जात आहेत. अशीच एक वेबसाईट आहे क्विकर, ज्यात नाणी खरेदी आणि विकली जातात. यामध्ये चांदीच्या 25 पैशांच्या नाण्यांचे मूल्य 1.50 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे.

तुमच्याकडे असे नाणे असल्यास, तुम्हाला ते विकण्यासाठी प्रथम Quikr च्या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही अटी आणि शर्तींनुसार तुमचे नाणे विकू शकता.

RBI च्या सूचना लक्षात ठेवा

केंद्रीय बँक RBI ने लोकांना जुनी नाणी आणि अशा नोटांच्या विक्रीबाबत सतर्क केले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, वेबसाइटवर अशा नोटा आणि दुर्मिळ नाण्यांची ऑनलाइन विक्री दोन्ही पक्षांमधील व्यवहारावर अवलंबून असते. आरबीआयची यात कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे सांभाळून राहा आणि स्वत:च्या रिस्कवरती व्यवहार करा.