जर तुमच्याकडे 50 पैशांचे हे नाणं असेल तर तुम्ही 1 लाख रुपये मिळवू शकता, कसं ते जाणून घ्या

अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुनी नाणी, नोटींसाठी बोली लावली जात आहे.

Updated: Oct 29, 2021, 05:47 PM IST
जर तुमच्याकडे 50 पैशांचे हे नाणं असेल तर तुम्ही 1 लाख रुपये मिळवू शकता, कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : तुम्हालाही नाणी जमा करण्याचा शौक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. काही लोकं आवड म्हणून जूनी नाणी जमाकरतात तर काही लोकांकडे अशी नाणी घरीच पडून असतात या नाण्यांचं काय करायचं त्यांना माहित नसतं. परंतु तुमच्याकडे जर अशी नाणी असतील तर तुम्ही लखपती झालातच म्हणूवन समजा, कारण तुम्हाला या अशा नाण्यांच्या खऱ्या मुल्यापेक्षा जास्त फायदा होणार आहे.

हे कसं शक्य आहे?

जुनी नाणी विकून लोकांना लाखो आणि करोडो रुपये मिळतात. ऑनलाइन लिलावात या नाण्यांना चांगली किंमत मिळते. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुनी नाणी, नोटींसाठी बोली लावली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय पैसे कमवू शकता.

सध्या या लिलावात 50 पैशांच्या नाण्याची चांगली डिल होत आहे. जर तुमच्याकडे 50 पैशांचं नाणे असेल तर त्या बदल्यात तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. यासाठी तुम्हाला त्याचा ऑनलाइन लिलाव करावा लागेल.

50 पैशांचं हे नाणे 2011 मध्ये बंद करण्यात आलं होतं

2011 मध्ये 25 पैशांच्या नाण्यांचे चलन बंद करण्यात आले होते. यानंतर सरकारने 50 पैशांची नाणी काढणे बंद केले. त्यानंतर तो हळूहळू ट्रेंडच्या बाहेर गेला. हे नाणं आता आपल्यासाठी निरुपयोगी झालं आहे. परंतु ते जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या डीलचा वापर करुन लाखो रुपये कमवू शकता.

कशी आणि कुठे करणार ही डील

जुन्या वस्तूंची विक्री करणाऱ्या OLX या प्लॅटफॉर्मवर हे नाणे एक लाख रुपयांना विकले जात आहे. या नाण्याची खास गोष्ट म्हणजे हे नाणे 2011 साली बनवण्यात आले होते. जर तुमच्याकडेही असे 50 पैशांचे नाणे असेल तर ते विकून तुम्हीही पटकन लखपती होऊ शकता.

हे नाणे अशा प्रकारे विकता येते

- जर तुमच्याकडे 2011 मध्ये बनवलेले 50 पैशांचे नाणे असेल तर तुम्ही ते OLX वर ऑनलाइन विकू शकता.
- या वेबसाइटवर या दुर्मिळ नाण्याला खरेदीदार मोठी रक्कम देत आहेत.
- नाणी विकण्यासाठी तुम्ही प्रथम स्वत:ची Olx वर विक्रेता म्हणून नोंदणी करा.
- यानंतर तुमच्याकडील नाण्याच्या दोन्ही बाजूंचा फोटो क्लिक करून अपलोड करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.
- वेबसाइटवर तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करा.
- ज्याला खरेदी करायची आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील

फक्त डील करताना काळजी घ्याल, कारण काही ठग लोकं या परिस्थितीचा फायदा उचलतात.