मुंबई : तुम्ही मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक जोडणी केली असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयानं ही जोडणी रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याला अनुसरुन पुढच्या पंधरवड्यात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या निमित्तानं ग्राहकांची डोकेदुखी मात्र वाढण्याची शक्यता आहे.
मोबाईल कंपन्यांना आता नव्यानं ओळखपत्र आणि पत्त्याचे पुरावा द्वावा लागण्याची शक्यता आहे. ग्राहकांची ओळख नोंदवण्यासाठी काही नवी यंत्रणा राबवता येईल काय? याविषयी मोबाईल कंपन्यांनीच मार्ग सुचवावेत, असं सरकारच्या दूरसंचार विभागानं म्हटलंय.
'आधार'बाबत सर्वोच्य न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. बँक खाते उघडणे, मोबाईल नंबर मिळविण्यासाठी, शाळा प्रवेश यासाठी आता आधार नंबर गरजेचा नाही. मात्र, पॅन कार्ड तसेच आयकर परताव्यासाठी आधार गरजेचे असणार आहे. अनेक गोष्टींसाठी आधारची सक्ती गरजेची नसली तर आधार घटनात्मरित्या योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायलयानं नुकताच दिला होता.