Vodafone-Idea टेलिकॉम कंपनी बंद झाल्यास 8 बँकाना बसणार फटका

टेलिकॉम सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी (Telecom  Company) व्होडाफोन (Vodafone) आणि आयडिया (Idea) काही वर्षांपूर्वी एकत्र आल्या.

Updated: Aug 6, 2021, 07:40 PM IST
Vodafone-Idea टेलिकॉम कंपनी बंद झाल्यास 8 बँकाना बसणार फटका title=

मुंबई : टेलिकॉम सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी व्होडाफोन आणि आयडिया काही वर्षांपूर्वी एकत्र आल्या. तेव्हापासून या दोन्ही कंपनींची जोरदार चर्चा सुरु आहे. कंपनीचं वाढतं नुकसान आणि नव्याने येणाऱ्या गुंतवणुकीत घट झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनीचे चेयरमन असलेले  कुमार मंगलम बिडला यांनीही पदाचा राजीनामा दिला. अफाट प्रयत्नांनंतरही कंपनीच्या अडचणीत घट कमी आणि वाढच जास्त होताना दिसतेय.  त्यामुळे जर कंपनी बंद झाली, तर  28 कोटी ग्राहकांना याचा फटका बसेलच. सोबतच देशातील या बड्या 8 बँकांनांही फटका बसेल. (If Vodafone Idea Telecom closes will 8 banks will also suffer)   
 
व्होडाफोन आयडियाच्या अडचणींसह एसबीआयसह एकूण 8 बँकांवर याचा परिणाम होईल. कंपनीने 1.80 लाख कोटींचं कर्ज आहे. कंपनीने हे कर्ज विविध माध्यमातून काढलं आहे.  यामध्ये बँकाचं एक्सोपजरचाही समावेश आहे. जर व्होडाफोन आयडिया कंपनी बंद झाली, तर या बँकांना मोठा फटका सहन करावा लागू शकतो.    

28 कोटी ग्राहकांवर परिणाम...

व्होडाफोन आयडिया  टेलिकॉम कंपनी बंद झाल्यास त्याचा थेट फटका हा मोबाईल ग्राहकांना बसणार आहे. सध्या व्होडाफोन आणि आयडियाकडे एकूण 28 कोटी ग्राहक आहेत. सोप्पं गणित आहे, जर कंपनी बंद झाली तर तुमचा  मोबाईल नंबरही बंद होईल. पण याचा फायदा अन्य टेलिकॉम कंपन्यांना होऊ शकतो.  

कंपनी बंद होण्याची चर्चा कशामुळे?

कंपनीच्या डोक्यावर मोठं कर्जाचं डोंगर आहे. ते दररोज वाढत चाललंय. कंपनीचा पाय खोलात असल्याने कोणी गुंतवणूक करण्यास तयार नाही. त्यामुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे चेयरमन यांनी सरकारला आपल्या कंपनीतील आपला हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला. पण सरकारकडून कंपनीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कंपनीच्या चेयरमनने राजीनामा दिल्याने कंपनी बंदच होणार, असे तर्क वितर्क लढवले जात आहेत.  दरम्यान व्होडाफोन इंडियाचे सीईओनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.  आपली कंपनी बंद होणार नाही, असा विश्वास त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलाय. पण आकडे दुसरंच काही सांगतायेत.  

विलीनीकरणानंतरही समाधान नाही.....

टेलिकॉम कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. कर्जबाजारी असलेल्या कंपनीला संकटातून बाहेर काढण्यासाठी चेयरमन यांनी सरकारकडून पॅकेजची मागणी केली होती. व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर 31 ऑगस्ट 2018 मध्ये एकत्र आले. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीला सातत्याने तोटा सहन करावा लागतोय. सध्या कंपनीवर 1.80 लाख कोटीचं कर्ज आहे. दोन्ही कंपन्या त्यांच्यावर असलेलं संकट कमी होईल, या उद्देशाने एकत्र आल्या. मात्र अडचणी कमी होण्याऐवजी त्या वाढतच चालल्यात.