Upcomming IPO | गुंतवणूकीसाठी पैसा तयार ठेवा; पुढील आठवड्यात 4 मोठे IPO बाजारात येणार

 पुढच्या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी कमाईची चांगली संधी असणार आहे. कारण 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान 4 मोठे IPO खुले होणार आहेत.

Updated: Aug 6, 2021, 03:32 PM IST
Upcomming IPO | गुंतवणूकीसाठी पैसा तयार ठेवा; पुढील आठवड्यात 4 मोठे IPO बाजारात येणार title=

मुंबई : पुढच्या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी कमाईची चांगली संधी असणार आहे. कारण 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान 4 मोठे IPO खुले होणार आहेत. म्हणजेच पूर्ण आठवड्यात बाजारात कमाईची संधी असणार आहे. CarTrade Tech, Chemplast Sanmar, Nuvoco Vistas आणि  Aptus Value Housing Finance India  या कंपन्यांचे आयपीओ बााजारात येणार आहेत. जर आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची इच्छा असेल तर, या चारही आयपीओ बाबतीत माहिती घ्या.

CarTrade Tech IPO
ऑनलाइन ऑटो क्लासिफाइड प्लॅटफॉर्म कारट्रेड टेकचा आयपीओ 9 ऑगस्टला सुरू होणार आहे. या आयपीओमध्ये 11 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. या इश्युच्या माध्यमातून 2999 कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे लक्ष आहे. कंपनीने या आयपीओची बॅंड प्राइज 1585 - 1618 रुपये ठेवली आहे. हा आयपीओ पूर्णतः  ऑफर फॉर सेलवर असणार आहे. CarTrade Tech ग्राहकांना नवीन आणि जुन्या दोन्ही प्रकारच्या कार खरेदी करण्याची सुविधा देते. 
आयपीओमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के भाग राखीव असेल. तर 35 टक्के भाग गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 15  टक्के भाग राखीव असणार आहे.

Chemplast Sanmar IPO
स्पेशलिटी केमिकल बनवणारी कंपनी केमप्लास्ट सनमार लिमिटेडचा आयपीओ 10 ते 12 ऑगस्टपर्यंत खुला असणार आहे. आयपीओची बॅंड प्राइज 530 - 541 रुपये इतकी आहे. आयपीओच्या माध्यमातून 3850 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.

राखीव भाग

संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 75 टक्के
गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के
रिटेल गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के 

Nuvoco Vistas Corporation IPO
नुवोको विस्टाचा आयपीओ 9 ते 11 ऑगस्टच्या दरम्यान खुला होणार आहे. या आयपीओसाठी प्राइज बॅंड 560 त-570 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. इश्यु साईज 5000 कोटींची असणार आहे.

Aptus Value Housing Finance India IPO
या कंपनीचा आयपीओ 10 ते 12 ऑगस्टदरम्यान खुला असणार आहे. या आयपीओसाठी प्राइज बँड 346-353 रुपये निश्चित करण्यात आली आहे.  या आयपीओतून 2780 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष असणार आहे.