IDBI बँकेत बंपर भरती, चांगल्या पगारासाठी पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

IDBI Recruitment 2023: आयडीबीआय बॅंकेत तब्बल 2100 रिक्त पदे भरली जाणार आहेत.  याअंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह- सेल्स & ऑपरेशन्सची पदे भरली जाणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 24, 2023, 12:27 PM IST
IDBI बँकेत बंपर भरती, चांगल्या पगारासाठी पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज title=
IDBI Bank

IDBI Recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. आयडीबीआय बॅंकेत बंपर भरती सुरु असून अधिकृत वेबसाइटवर यासाठी नोटिफिरकेशन जाहीर करण्यात आले आहे.पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

आयडीबीआय बॅंकेत तब्बल 2100 रिक्त पदे भरली जाणार आहेत.  याअंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) च्या 800 जागा भरल्या जातील. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना यामध्ये 55 टक्के गुण अशी सवलत देण्यात येणार आहे. एक्झिक्युटिव्ह- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) च्या एकूण  1300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. 

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह- सेल्स & ऑपरेशन्स पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. 

जनरल/ओबीसी उमेदवारांकडून 1 हजार रुपये तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह- सेल्स & ऑपरेशन्स  पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 29 हजार ते 31 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांना संपूर्ण भारतातील आयडीबीआय बॅंचमध्ये नोकरी करता येणार आहे. यासाठी 30 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा, मुलाखत, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

6 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी उमेदवारांन अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्या. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 'येथे' क्लिक करा