मुंबई : जवळपास १९३८ पासून देशभरात अनेकांचीच भूक भागवणाऱ्या पार्लेजी या बिस्कीटानं CORONAVIRUS कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात एक नवी किमया केली आहे. या काळात बिस्कीटांच्या उत्पादनाचा आकडा विक्रमीरित्या उंचावला असून, ही बाब सर्वांचं लक्ष वेधत आहे.
पार्लेजी कंपनीतर्फे विक्रीची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली नसली, तरीही त्यांच्याकडून या विक्रमी विक्रीच्या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये मागील आठ दशकांतील सर्वाधिक विक्री झाल्यचं उघड होत आहे.
'गेल्या काही काळात आमत्याकडे विक्रीचा दर एकूण ५ टक्के वाढला आहे. यामध्ये ८० ते ९० टक्के भाग हा पार्लेजीचा आहे. हे खरंतर अनपेक्षित होतं', असं पार्ले प्रोडक्ट्सचे विभाग प्रमुख मयांक शाह म्हणाल्याचं कळत आहे.
जगभरात कोरोना विषाणूचं थैमान सुरु असतानाच या पारश्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशातही लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊनच्या याच काळात उदरनिर्वाहासाठी किंवा खाण्यापिण्यच्या वस्तूंची निवड करत असताना अनेकांनीच पार्लेजी या बऱ्याच जुन्या तरीही तितक्या लोकप्रिट बिस्कीटालाही पसंती दिली. मुळात ज्या वस्तू खरेदीच्या वेळी दुकानांमध्ये उपलब्ध होत्या, त्या लगेचच खरेदी करण्याची भूमिका ग्राहकांनी यादरम्यानच्या काळात घेतली होती.
...म्हणून डेव्हिड वॉर्नरला पवार दाम्पत्याचं याड लागलं
शिवाय मागिल १८ ते २४ महिन्यांपासून देशांच्या ग्रामीण भागात पार्लेजीकडून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याच प्रयत्नांना आलेलं हे यश आहे, असं म्हणणं वावगं ठरणार ऩाही. सध्याच्या घडीवा ग्राहकांची वाढती मागणी पाहता ती पूर्ण करण्याकडेच पार्लेजीचा भर दिसत आहे. त्यामुळं पार्लेजी खऱ्या अर्थानं जी माने जिनियस ठरला, हे नाकारता येत नाही.
दरम्यान, सद्यस्थितीला संपूर्ण देशामध्ये पार्लेजीचे १३० कारखाने आहेत. ज्यापैकी १२० कारखान्यांमद्ये सातत्यानं या बिस्कीटांचं उत्पादन घेण्याचं काम सुरु आहे.