आमिर खानच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, पत्नीने रोमँटिक पोस्ट केली शेअर

नुकताच आमिर खान यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने त्यांच्या पत्नीने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Updated: Oct 2, 2023, 04:50 PM IST
आमिर खानच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, पत्नीने रोमँटिक पोस्ट केली शेअर title=

मुंबई : IAS अतहर आमिर खान हे देशातील सर्वात लोकप्रिय अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. 2015 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हापासून ते त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी 01 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी त्यांच्या पत्नी डॉक्टर मेहरीन काझी यांनी लग्नाचे काही सुंदर फोटो तसेच एक पोस्ट शेअर केली आहे.

IAS अतहर आमिर खान हे देशातील सर्वात लोकप्रिय आणि स्मार्ट अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. सध्या ते श्रीनगरमध्ये पोस्टेड आहेत. 2015 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला होता. तेव्हापासून ते कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर कधी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. IAS अतहर आमिर खान देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

IAS अतहर आमिर खान यांचं 01 ऑक्टोबर 2022 रोजी डॉ. मेहरीन काझी यांच्याशी दुसरं लग्न केलं. डॉक्टर मेहरीन काझी सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आणि सक्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर डॉ. मेहरीन काझी यांचे इन्स्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या दोघांची जोडी खूप लोकप्रिय आहे. 2023 मध्ये, IAS अतहर आमिर खान आणि डॉ. मेहरीन काझी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.

डॉक्टर आणि आयएएसची ही जोडी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आयएएस अतहर आमिर खान हे त्यांच्या कुटुंबातील पहिले सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी हिमाचल प्रदेशातील IIT मंडी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech ची पदवी प्राप्त केली आहे . अतहरने 2015 मध्ये वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी IAS परीक्षा उत्तीर्ण केली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. मेहरीन काझी या अतहर आमिरच्या वडिलोपार्जित निवासस्थानी म्हणजेच लाल बाजार, श्रीनगर येथील रहिवासी आहेत. डॉ. मेहरीन यांच्याकडे मेडिसिनची पदवी आहे. त्यांनी यूके आणि जर्मनीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी दिल्लीतील राजीव गांधी कर्करोग संस्था आणि संशोधन केंद्रातही काम केलं आहे.