मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ७५ वर्षावरील नेत्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय हा पक्षाने घेतला आहे.यापूर्वी लालकृष्ण आडवाणी यांना सहा वेळा गांधीनगर मधून लोकसभेवर पाठवले आहे. आज भाजपा अध्यक्ष अमित शहा हे उमेदवार आहे. ते पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवित आहे.मी २५ वर्ष विधानभा सदस्य होतो.माझा कार्यकाळ संपला त्यावेळी निवडणुक नसल्यामुळे मला राज्यसभेवर पाठवले गेले.माझी इच्छा होती.की मी जनतेतून संसदेत जावं. यासाठी मी निवडणुकीत उतरलो आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना यंदा उमेदवारी न दिल्यामुळे अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर टीका देखील होत आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटलं होतं की, 'ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आधी मार्गदर्शक मंडळात पाठवले त्यानंतर आता त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हे ज्येष्ठांचा आदर करु शकत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर कसा करणार?.'