पत्नीला घाबरविण्यासाठी पतीच हवेत गोळीबार, बाल्कनीतील महिलेच्या पोटात घुसली गोळी

देशाची राजधानी एका घटनेने हादरली.  

Updated: Sep 14, 2019, 02:27 PM IST
पत्नीला घाबरविण्यासाठी पतीच हवेत गोळीबार, बाल्कनीतील महिलेच्या पोटात घुसली गोळी title=

नवी दिल्ली : देशाची राजधानी एका घटनेने हादरली. दिल्लीतील नरेला (Narela) बी - २ परिसरात पती-पत्नीमध्ये जोरदार कडाक्याचे भांडण झाले. यावेळी एक महिला गॅलरीतून भांडण पाहत होती. यावेळी पतीने पत्नीला घाबरविण्यासाठी हवेत गोळीबार केला. मात्र, गॅलरीत उभ्या असलेल्या महिलेच्या पोटात गोळी घुसली. पती-पत्नीचे भांडण ऐकणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पती - पत्नीमध्ये नेहमीच भांडत होत असे. मात्र, काल जोरदार भांडण झाले. यावेळी पतीने पत्नीला मारहाण केली. त्यावेळी इमारतीत भांडणाचा आवाज आला. यावेळी दुसऱ्या घरातील महिला बाल्कनीमध्ये उभी राहून भांडणाचा प्रकार पाहत होती. मात्र, पत्नीला घाबरविण्यासाठी पतीने हवेत गोळी झाडली. मात्र, बाल्कनीत असलेल्या महिलेला गोळी लागली. 

या भांडणानंतर शेजार्‍यांने सांगितले की, अनेक दिवसांपासून पती-पत्नीमध्ये भांडण चालू आहे. कालही त्याने पत्नीला मारहाण केली होती आणि आज (शुक्रवारी) पत्नीला जबरदस्तीने गाडीत घेऊन जात होते. त्यानंतर तो तरुण आपल्या गाडीतून खाली उतरला, त्यानंतर त्याने देसी कट्टावरून हवेत गोळीबार केला, यावेळी बाल्कनीत उभी असलेल्या महिलेच्या पोटात गोळी घुसली.

या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटली असून ती २१ वर्षांची रचना आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या सासरच्या व्यक्तींच्या वरच्या मजल्यावर राहत होती. गोळीबार केल्यानंतर पती आपल्या पत्नीला गाडीत बसवून घटनास्थळावरून पळून गेला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.