मुंबई : असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. परंतु ज्या प्रेमासाठी तुम्ही जीवाचा आटापिटा करतात. ते प्रेमच तुमच्या जावावर उठलं तर? अशी बिहारमधील घटना समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. कारण प्रेम करणं एका तरुणाच्या जिवावर बेतलं आहे. येथे एका तरुणाचे शेजारी राहणाऱ्या विवाहीत महिलेसोबत प्रेम जुळलं परंतु नंतर या प्रेमनं तरुणाचं आयुष्यच संपवलं.
या तरुणाचं ज्या महिलेवर प्रेम होतं ती, महिला तीन मुलांची आई आहे. एके दिवशी जेव्हा या विवाहितेचा नवरा घरी नव्हता, तेव्हा तिने आपल्या प्रियकराला भेटायला बोलावले. परंतु त्यावेळी या महिलेचा नवरा घटनास्थळी पोहोचला आणि त्यानंतर यांची कहाणी अशी काही पलटली की, जणू तुम्हाला धक्का बसेल.
खरेतर पोलीसांना जेव्हा अनिलकुमार महतो नावाच्या व्यक्तीचं शरीर जंगलात सापडलं तेव्हा गावात आणि परिसरात खळबळ उडाली. ज्यानंतर विवाहबाह्य प्रेमसंबंधाचे भयंकर परिणाम स्थानिक पोलिसांनी उघड केले आहेत.
अनिलकुमार महतोच्या हत्येने गावात आणि परिसरात खळबळ उडाली होती. नातेवाईकांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ृ
घटनेच्या अवघ्या ४ दिवसांत या हत्येचे आरोपी पोलिसांनी शोधून काढले आहेत. तसेच चौकशीदरम्यान तरुणाची विवाहित प्रेयसी आणि तिच्या पतीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी सांगितले की, महिलेने नवरा घरी नाही याची खात्री करुन मध्यरात्रीनंतर प्रियकराला भेटण्यासाठी बोलावले होते. हा प्रियकर, म्हणजेच अनिल ठरवलेल्या ठिकाणी पोहोचला. काही वेळाने महिलाही घटनास्थळी पोहोचली.
रात्रीच्या अंधारात दोघेही रोमान्स करू लागले. परंतु महिलेच्या नवऱ्याला यासगळयाची आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे तो आपल्या बायकोचा पाठलाग करत घटनास्थळी पोहोचला आणि आपल्या बायकोला दुसऱ्या व्यक्तीच्या मिठीत पाहून त्या नवऱ्याला राग आला.
नवऱ्याने जेव्हा बायकोला आणि अनिलकुमारला या सगळ्या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा, अनिलला राग अनावर झाला. ज्यामुळे तो या महिलेच्या नवऱ्याला मारायला धावून आला. परंतु आपल्या नवऱ्यावर हल्ला होताना पाहून बायकोने आपल्या नवऱ्याची बाजू घेण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर या नवरा-बायकोनं मिळून प्रियकर अनिलचाच गळा आवळून त्याला संपवलं.
तरुणाची हत्या केल्यानंतर नवरा-बायकोनं त्याचा मृतदेह घटनास्थळापासून दूर फेकून दिला. परंतु पोलिसांनी या घटनेचे धागे दोरे एकत्र करत संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं.
सध्या पोलिसांनी पती-पत्नीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.