Kashmir : सोपोरमधील दहशतवादी तळ उध्वस्त

सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या एका कारवाईत....

Updated: Dec 2, 2019, 08:18 AM IST
Kashmir : सोपोरमधील दहशतवादी तळ उध्वस्त title=
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : सुरक्षा दलांकडून करण्यात आलेल्या एका कारवाईत kashmirमधील सोपोर भागातील रफियाबाद येथील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा, शस्त्रास्त्रचा साठा आणि सॅटेलाइट फोन जप्त केला गेला आहे.

उध्वस्त करण्यात आलेल्या या दहशतवदी तळावरून एके४७ रायफल,  २ हजार एके रायफल राऊंड, तीन आरपीजी राउंड, दोन वायरलेस सेट आणि एक सॅटेलाइट फोन जप्त करण्यात आला आहे. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून, संबंधित प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन 

जम्मू काश्मीरमधील पूंछ येथे असणाऱ्या नियंत्रण रेषेपाशी रविवारपासून पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यामद्ये सीमेपलीकडून गोळीबार आणि तोफगोळ्यांचा माराही करण्यात आला. भारताकडून पाकिस्तानला याचं चोख उत्तर देण्यात आलं ज्यामध्ये शेजारी राष्ट्राचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

२०१९ मध्ये जानेवारी महिन्यापासून १५ नोव्हेंबरपर्यंत पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर भागातील नियंत्रण रेषेजवळ जवळपास २,५०० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानकडून वारंवार ही कारवाई करण्यात येत असून वेळोवेळी भारतीय सैन्याकडून त्याचं जशास तसं उत्तर देण्यात येत आहे.