Nilpaint remover hacks: रिमूव्हरशिवाय नेलपेंट काढण्याच्या हटके ट्रिक्स एकदा वापराचं..

nailpaint remover hacks: बऱ्याचदा अचानक बाहेर जायचा प्लॅन बनतो आणि आपल्याला तयार व्हायचंय, नेलपेंट लावायचयं पण रिमूव्हर नाही मग करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्या घरात टूथपेस्ट कायम असते. नेलपॉलिश काढण्यासाठी हा उपाय योग्य आहे. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर टूथपेस्ट लावा आणि बोटांवर चोळा.

Updated: Jan 26, 2023, 04:20 PM IST
Nilpaint remover hacks: रिमूव्हरशिवाय नेलपेंट काढण्याच्या हटके ट्रिक्स एकदा वापराचं.. title=

How to remove nailpolish without remover: सुंदर दिसण्यासाठी मुली आणि स्त्रिया अनेक प्रकार अवलंबत असतात. मग नखापासून केसांपर्यंत सर्व काही अगदी व्यवस्थित असावं असं प्रत्येकीला वाटत असतं. कोणत्याही इव्हेंटसाठी तयार व्हायचं म्हणजे सर्वकाही मॅचिंग असण्यावर भर दिला जातो. ज्या रंगाचा ड्रेस असेल त्याच रंगाचं नेलं पेंट लावलं जातं.  नेल पॉलिश लावल्याने नखांचे सौंदर्य खुलते. पण नेलपॉलिश लावताना ती नखाबाहेर लागल्यास ती पुसणे काहीसे अवघड होते. तुम्हालाही याचा अनुभव आला असेल. त्यामुळे असे काही घरगुती उपाय ज्यामुळे नेलपॉलिश काढणे अतिशय सोपे होते. (How to remove nailpolish without remover)

अल्कोहोल
नेलपॉलिश अगदी सहज काढण्याचा सोपा उपाय म्हणजे अल्कोहोल. काहीच वेळात तुम्ही अल्कोहोलच्या मदतीने नेलपॉलिश काढू शकता.

आणखी वाचा: या ५ प्रकारे नेलपॉलिश नखांसाठी ठरते नुकसानकारक!

व्हिनेगर
अल्कोहोल घरात असेलच असे नाही. पण व्हिनेगर असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नेलपॉलिश काढण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर व्हिनेगर घ्या आणि हळूहळू नखांवर लावा. (How to remove nailpolish without remover tricks)

लिंबू
नेलपॉलिश काढण्याचा लिंबू हा अतिशय नैसर्गिक उपाय आहे. नखांवर लिंबू घासल्याने नेलपॉलिश सहज निघते. त्याचबरोबर गरम पाण्यात साबण आणि लिंबाचा रस घालून त्यात 5-6 मिनिटे हात बुडवून ठेवा. त्यामुळे नेलपॉलिश सहज निघेल.

डियोड्रन्ट
हा उपाय कदाचित तुम्हाला माहित नसेल पण नेलपॉलिश काढण्यासाठी नखांवर डियोड्रन्टं स्प्रे करा. त्यात नेलपॉलिश रिमूव्हरसारखे घटक असतात. त्यामुळे त्यातून नेलपॉलिश अगदी सहज काढू शकाल. (How to remove nailpolish without remover tricks and ideas)

गरम पाणी
इतर कोणतेही उपाय उपलब्ध नसतील तर नेलपॉलिश काढण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करु शकता. एका मोठ्या भांड्यात सुमारे 10 मिनिटे बोटे बुडवून ठेवा आणि कापसाचा बोळा नखांवर घासा. नेलपॉलिश निघून जाईल.

टूथपेस्ट
घरात टूथपेस्ट कायम असते. नेलपॉलिश काढण्यासाठी हा उपाय योग्य आहे. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर टूथपेस्ट लावा आणि बोटांवर चोळा.

चला तर मग,हा हटके उपाय एकदा नक्की करून पाहा आणि आपल्या फ्रेंड्सनासुद्धा नक्की सांगा. आणि तुमच्याकडे याहीपेक्षा काही भन्नाट ट्रिक्स असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा.