Cooking Tips : पूर्वी केवळ वाढदिवसाला केक खाल्ले जायचे पण आजकाल हवं तेव्हा केक खायची इच्छा झाली कि तुम्ही केक खाऊ शकता. बाजारात आजकाल अनेक प्रकारच्या केक्सचे ब्रॅण्ड्स मार्केटमध्ये आहेत. पण बाजारात बनलेले केक त्यात घातलेलं केमिकल आपल्या आरोग्यासाठी किती घटक आहे. आपण सारेच जाणतो. बरं घरी केक बनवणं म्हणजे (How to make cake at home) वाटतं तितकं सोप्प काम नाहीये. केक बनवणं म्हणजे फार किचकट काम. कारण प्रमाण जरा जरी चुकलं तर केकचा बेत फसतो. पण आज अशी एक सिक्रेट रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा केक अगदी मऊ आणि परफेक्ट (cake recipe) होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. केक कोणताही बनवायचा असेल तर त्याचा बेस परफेक्ट बनणं खूप महत्वाचं असतं. बेस एकदा का व्यवस्थित झाला कि पुढचा केक अगदी परफेक्ट होतो. बेस तयार झाल्यानंतर त्यावर आपण क्रीमची फ्रॉस्टिंग करून, आवडीनुसार केक डेकोरेट करू शकता. चला तर मग जाणून घेऊया परफेक्ट केक कसा बनवायचा. (Perfect Recipe of Vanilla Cake)