चुकून LPG अनुदान सुटलंय ? पुन्हा मिळवण्यासाठी 'ही' सोपी पद्धत

चुकून एलपीजी सबसिडी सुटलेल्यांना याचा मोठा फायदा 

Updated: May 12, 2021, 09:42 AM IST
चुकून LPG अनुदान सुटलंय ? पुन्हा मिळवण्यासाठी 'ही' सोपी पद्धत title=

नवी दिल्ली : स्वयंपाक गॅस सिलिंडरवर प्रत्येक ग्राहकांना सरकार अनुदान देते. ग्राहक जर गॅस घेण्यास सक्षम असेल तर तो स्वतःच एलपीजी अनुदान (LPG Subsidy) सोडू शकेल असा यात एक पर्याय आहे. सरकारने यासाठी 'गिव्ह इट अप' उपक्रम सुरू केला. याला पाठींबा देत अनेकांनी आपले एलपीजी अनुदान सोडले. पण काही नागरिकांकडून चुकून एलपीजी अनुदान सोडले गेले आहे. अशा नागरिकांना सोडलेले अनुदान पुन्हा मिळवायचे असेल तर काय करावे? हा प्रश्न विचारला जातो. तेल विपणन कंपन्यांकडून यासाठी सुविधा दिली जाते. यामुळे चुकून एलपीजी सबसिडी सुटलेल्यांना याचा मोठा फायदा होईल.

एलपीजी ग्राहकांना गॅस अनुदानाचा थेट लाभ देण्यासाठी सरकारने त्यांचे गॅस कनेक्शन बँक खाते आणि आधार कार्डशी जोडले होते. त्यासोबतच देशभरात सबसिडी देण्यासाठी गेट इट अप मोहीम राबविली गेली. या मोहिमेचा एक भाग म्हणून, अनुदानाशिवाय सहजपणे एलपीजी सिलिंडर घेऊ शकणार्‍या एलपीजी ग्राहकांना अनुदान सोडावे अशी विनंती केली गेली होती. वास्तविक गरजूंना लाभ व्हावा यामागचा हेतू आहे.

एलपीजी अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या गॅस एजन्सीकडे जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासह आयडी पुरावा, अ‍ॅड्रेस प्रूफ, गॅस कनेक्शनची कागदपत्रे आणि उत्पन्नाच्या दाखल्याची प्रतही द्यावी लागेल. अनुदान मिळण्यासाठी वार्षिक उत्पन्न १० लाखापेक्षा कमी किंवा त्याहून कमी असावे. गॅस एजन्सी ग्राहकांना फॉर्म भरण्यासाठी देईल. यानंतर एजन्सीमार्फत चौकशी केली जाईल. आणि गॅस अनुदान सुमारे आठवडाभरात पुन्हा सुरू केले जाईल.

एलपीजी सबसिडीबद्दल संपूर्ण माहितीसाठी ग्राहकांनी त्यांच्या जवळच्या गॅस डीलरशीप किंवा त्यांच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा. तेथे, ग्राहकांना आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल, जेणेकरुन पुन्हा अनुदान मिळणे सोपे होईल.