टोपीवाल्या चाचाने कमालच केली, ताशाच्या आवाजावर 'तो' बेधुंद नाचला!

ताशाचा आवाज तरारा झाला अन्...

Updated: Oct 2, 2022, 05:24 PM IST
टोपीवाल्या चाचाने कमालच केली, ताशाच्या आवाजावर 'तो' बेधुंद नाचला! title=

Trending Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे हृदयस्पर्शी असतात तर काही व्हिडीओ हे हादरवणारे असतात. सोशल मीडियावर (Social Media) डान्सचे सर्वाधिक व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. डान्स व्हिडिओ (Viral Dance Video) नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात. अशातच आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक नाणं ताशाच्या आवाजावर नाचताना दिसत आहे. (Trending Video of coin dancing to the beat of a drum)

नुकताच असा धक्कादायक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला, जो पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ताशा वाजवताना दिसत आहे आणि त्या ताशाच्या इशाऱ्यावर एक दहा रुपयाचं नाणं नाचताना दिसत आहे.

काळी टोपी घातलेला एक व्यक्ती पुर्ण ताकद लावून ताशा वाजवतो. तर दुसरा व्यक्ती एक दुसरा ताशा घेऊन उभा असतो. त्या ताशावर एक दहा रुपयाचा नाणं ठेवलेलं असतं. काळी टोपी घातलेला व्यक्ती ताशा वाजवतो, त्यावेळी नाणं देखील ताशाच्या इशाऱ्यावर नाचतो (trending Video Of Coin Dance).

पाहा व्हिडीओ-

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Verma (@aditi.sverma)

दरम्यान, व्हायरल  (Amazing Video Of Coin Dance) झालेल्या व्हिडीओमागे सामान्य ज्ञान आहे. दोन्ही ताशाचे रेसिस्टंस एकसमान झाल्यावर आवाजानुसार नाणं नाचतो. व्हिडीओपाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जातोय.