'तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू'

पाकिस्तानने त्यांच्या कुरापती थांबवल्या नाहीत तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय.

Updated: Jan 21, 2018, 10:25 PM IST
'तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू' title=

लखनऊ : पाकिस्तानने त्यांच्या कुरापती थांबवल्या नाहीत तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय. सीमेलगत पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. या कुरापतींना आम्ही जशास तसं उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला.

जगभरामध्ये भारताची प्रतिमा एक मजबूत देश अशी बनली आहे. आम्ही पाकिस्तानबरोबर चांगले संबंध ठेऊ इच्छीतो. पण पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीयेत. आम्ही जगाला संदेश दिला आहे की भारत सीमेच्या याचबाजूला नाही तर गरज पडली तर त्याबाजूलाही घुसून दुश्मनांचा खात्मा करेल, असं राजनाथ सिंग म्हणले. लखनऊमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राजनाथ सिंग यांनी हे वक्तव्य केलंय.