पंजाब : पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM MODI) यांच्या ताफ्यातील सुरक्षेबाबत भाजप नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेही याप्रकरणी निवेदन जारी केलं आहे. आता खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. गृह मंत्रालयाने पंजाबमधील सुरक्षा उल्लंघनाचा तपशीलवार अहवाल मागवला आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षा प्रक्रियेत असा निष्काळजीपणा स्विकारला जाणार नाही, या प्रकरणी जबाबदारी निश्चित केली जाईल, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
जनतेने वारंवार नाकारल्यामुळे काँग्रेस आता संवेदना गमावत आहे, काँग्रेसने आपल्या कृत्याबद्दल देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
स्मृती इराणी यांचीही टीका
काँग्रेस मोदींचा द्वेष करते हे सर्वांना माहीत आहे, त्यांचा पराभव करायचा असेल तर निवडणुकीत करा. पण जर तुम्ही देशाच्या पंतप्रधानांचा द्वेष करत असाल आणि त्यांच्या विरोधात असं षडयंत्र रचले तर देश ते सहन करणार नाही.