Hindu Rashtra : हिंदू राष्ट्र आणि शिवरायांचा दाखला; भाजप आमदाराची शपथ ऐकली का?

दिवाळी आणि रामनवमीला दगडफेक का होते? धर्माच्या नावावर फूट असताना धर्माच्या नावावर दंगली का होतात?

Updated: May 3, 2022, 12:51 PM IST
Hindu Rashtra : हिंदू राष्ट्र आणि शिवरायांचा दाखला; भाजप आमदाराची शपथ ऐकली का? title=

हरियाणा : हरियाणाच्या (Haryana) अंबाला येथील भाजप (BJP) आमदारांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात शेकडो लोकांसमोर हे आमदार 'भारताला हिंदु राष्ट्र' (Hindu Rashtra) बनविण्याची शपथ घेताना दिसत आहेत. भारताला हिंदु राष्ट्र बनविण्यासाठी कोणताही त्याग करण्याची शपथही या आमदारांसह अनेकांनी घेतली आहे.

भाजपचे आमदार असीम गोयल (BJP MLA ASIM GOYAL) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ( Shivaji Maharaj ) 400 वर्षांपूर्वी शपथ घेताना भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे म्हटले होते. देशातील कोणताही नागरिक कोणत्याही जाती, धर्माचा असला तरी तो हिंदूच आहे.

हिंदू (HINDU) हा धर्म आहे, ख्रिश्चन (CATHOLIC) धर्म आहे आणि इस्लाम (ISLAM) मजहब आहे. परंतु, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म मानणारेही हिंदू आहे. त्यामुळे त्यांना भारताबद्दल आदर असायलाच हवा. धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. असे असताना अजूनही देशात धर्माच्या नावावर दंगली कशासाठी होतात? दीपावली, रामनवमीला दगडफेक होते याची करणे काय?

ज्याला भारतात रहायचे असेल त्याला हिंदु राष्ट्रानुसार हिंदुस्थानी म्हणूनच येथे राहावे लागेल. आम्ही जी बलिदानाची शपथ घेतली आहे. त्या बलिदानाचा अर्थ गळा चिरणे नाही. तर, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीने दुसऱ्यांची करणे असा असल्याचे आमदार असीम गोयल यांनी स्पष्ट केले.