हिंदू-मुस्लिम दाम्पत्याला रुम देण्यास हॉटेलचा नकार

येथील एका हॉटेल व्यवस्थापनाने एका हिंदू-मुस्लिम दाम्पत्याला रुम देण्यास नकार दिला. 

ANI | Updated: Jul 5, 2017, 02:59 PM IST
हिंदू-मुस्लिम दाम्पत्याला रुम देण्यास हॉटेलचा नकार title=
छाया सौजन्य - फेसबूक वॉल

बंगळुरु : येथील एका हॉटेल व्यवस्थापनाने एका हिंदू-मुस्लिम दाम्पत्याला रुम देण्यास नकार दिला. 

केरळ येथील शाफीक सुबैदा हकीम आणि दिव्या डी. व्ही हे दाम्पत्य काही कामानिमित्त बेंगळुरुत गेलं होतं. ते सुदामा नगरमधील अन्नीपुरम रस्त्यावरील ऑलिव्ह रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये गेले. त्यांना अर्धातासाठी रुम हवी होती. याबाबत त्यांनी रिसेप्शनिस्टला सांगितलं. पण तिनं या दाम्पत्याला रुम देण्यास नकार दिला. त्यानंतर एक दिवसासाठी रुम हवी असल्याचे सांगितले.

हिंदू आणि मुस्लिम जोडपं असल्याचे कारणे देऊन रुम नाकारल्याचा दावा या दाम्पत्यांनी केलाय. कोणताही वाद उद्भवू नये म्हणून हिंदू-मुस्लिम जोडप्याला रुम देऊ नये, अशा सूचना आपल्याला मिळाल्याचे सांगून रिसेप्शनिस्टने रुम देण्यास स्पष्ट नकार दिला, असा दावा या दाम्पत्याने केलाय. 

दरम्यान, हॉटेल मालक शिबू यांनी दाम्पत्याने केलेल्या आरोपाचं खंडन केलं आहे. त्यांनी पती-पत्नी असल्याचं आम्हाला सांगितलंच नाही. याशिवाय त्यांनी केवळ अर्ध्या तासासाठीच रुम मागितली होती. त्यामुळं रुम देण्यास नकार दिला, असं शिबू यांनी सांगितले.