National News : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) नं एक मोठा निर्णय घेत हिमालयन याक (Himalayan Yak) या प्राण्याला 'Food Animal' म्हणून मान्यता दिली आहे. FSSAI कडून मिळालेल्या या मंजुरीमुळं थंड प्रदेशात (Cold places) असणाऱ्या आणि मोठ्या फरकानं घट होणाऱ्या या प्राण्यांच्या संवर्धनास मदत होणार असल्याची अपेक्षा आता ठेवली जात आहे. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) पश्चिम कामेंग जिल्ह्यातील NRC मध्ये असणाऱ्या मिहिर सरकार यांनी यासंदर्भातील माहिती दिली. (Himalaya yak milk and meat to be sold in nearest store )
सदर मान्यता मिळण्यासाठी 2021 मध्येच FSSAI कडे प्रस्ताव देण्यात आला होता. ज्यानंतर आता पशुपालन आणि डेअरी क्षेत्रांच्याही शिफारसीनंतर याला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. Food Animals विभागात त्या प्राण्यांची गणती केली जाते ज्यांचा मानवाकडून खाद्य उत्पादन किंला अन्य प्रकारे सेवन करण्यासाठी वापर करण्यात येतो. दरम्यान, याकच्या मांस आणि दुधाला मिळालेल्या मान्यतेमुळे आता या प्राण्याचाही प्रयोग कुक्कुटपालनाच्या धर्तीवर करता येऊ शकतो.
याकच्या दुधामध्ये अनेक पोषक तत्त्वं असतात. प्रथिनं आणि स्निग्ध घटकांनी परिपूर्ण असणाऱ्या या दुधामध्ये क्षारांचंही तितकंच प्रमाण असतं. याकच्या दुधात असणारी औषधी तत्वं नाकारता येत नाहीत. nutritional analysist च्या आधारे सांगावं तर, याकच्या दुधात 78-82% पाणी, 7.5-8.5% स्निग्ध घटक, 4.9-5.3% प्रथिनं, 4.5-5.0% लॅक्टोज, 12.3-13.4% फॅट्स (सॉलिड फॅट्स नव्हे) आढळतात. सध्याच्या घडीला देशाच्या उत्तर भागात असणाऱ्या आणि अतिप्रचंड थंड ठिकाणांवर याकच्या दुधाचा आणि मांसाचा वापर केला जातो.
विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा प्रयोग करणाऱ्यांसाठी आणि मुख्य म्हणजे मांसाहार करणाऱ्यांसाठी आता याकचं मांस सहजपणे उपलब्ध असणार आहे. सध्याच्या घडीला भारतात साधारण 58 हजार याक आहेत. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, तवांग आणि लडाख या भागांमध्ये हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो.