Budget 2023 Big News: सरचार्ज रेट (highest surcharge rate) 37 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे देशातील करांचे दर 39 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. नवीन कर प्रणालीमध्ये (new tax system) सर्वोच्च अधिभार (surcharge) दर 37% वरून 25% पर्यंत कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं अर्थमंत्री (Nirmala Sitharaman) म्हणाल्या आहेत. (highest surcharge rate cut from 37% to 25% in new tax regime)
मिडल क्लास वर्गासह श्रीमंतांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. सर्वाधिक उत्पन्न अधिभार 37% वरून 25% पर्यंत कमी केला. त्याचबरोबर सर्वोच्च कर दर 42.74% वरून 39% पर्यंत खाली आलाय. त्यामुळे पर्यायी गुंतवणूक निधीसाठी लाभ मिळणार आहे.
श्रीमंतांवर कमी कर लावणे म्हणजे अधिक गुंतवणूक करणं, अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. निरोगी अर्थव्यवस्थेसाठी ही सर्वात मोठं पाऊल असल्याचं म्हटलं जातंय. भांडवली नफ्याच्या पद्धतीत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
अधिभार हे अतिरिक्त शुल्क किंवा कर आहे. सोप्या भाषेत करावर कर. अधिभार हा अतिरिक्त शुल्क, कर किंवा पेमेंट आहे जो एखाद्या वस्तू किंवा सेवेच्या आधीच अस्तित्वात असलेल्या किंमतीच्या वर लादला जातो. त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवर होतो.