कॉल मर्ज करताय? सावधान सरकारने जारी केला अर्लट

हॅकर्स अनेक वेगवेगळे पर्याय वापरून आपलं खातं रिकाम करायला बघतात.

Updated: Jan 13, 2022, 08:49 PM IST
कॉल मर्ज करताय? सावधान सरकारने जारी केला अर्लट title=

मुंबई : सध्या बहुतांश व्यवहार हे डिजीटल पद्धतीने होत आहे. हे एका एक प्रकारचे चांगले आहे. कारण यामुळे आपला वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात, तसेच झटपट काम होते. परंतु यासोबतच सायबर क्राईमच्या केसेस देखील वाढताना दिसत आहेत. हे वाढते केसेस बघता सरकारने काही अर्लट जारी केले आहेत, कोरोनाकाळात तर या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झालीये. सायबर फ्रॉड करून पैसे मिळवणं हा एक धंदाच झाला आहे. आपल्याला दिवसभऱात असंख्य फोनकॉल्स येत असतात, आपण ते कॉल उचलतो आणि हॅकर्सच्या जाळ्यात अडकतो. यापासून वाचण्यासाठी cyber dost ने काही निर्देश दिले आहेत.

जर तुम्ही एखाद्या अशा फ्रॉडच्या शिकार झालात तर तुम्ही 155260  हेल्पलाईन नंबर वर तक्रार नोंदवू शकता.

हॅकर्स अनेक वेगवेगळे पर्याय वापरून आपलं खातं रिकाम करायला बघतात, त्यातच आता हॅकर्सने नवीन युक्ती शोधून काढलीये. आपण फोनवर बोलत असताना आपल्याला दुसऱ्या अनोळखी नंबरवरून कॉल येतो. तो कुणी महत्त्वाच्या व्यक्तिचा तर नाहीना हे बघण्यासाठी आपण आधिचा कॉल वेटिंगवर ठेवून तो आलेला कॉल उचलतो आणि तेव्हाच नेमकी गल्लत होते. कारण हा कॉल हॅकरचा असतो जो तुमचं बँक खातं रिकामं करतं.

cyber dost या  अधिकृत भारताच्या गृह मंत्रालयाने ओटीपी फ्रॉड (otp fraud) संबंधात  सूचना जारी केल्या आहेत. cyber dost च्या ट्विट नुसार जर तुम्ही एखाद्याचा कॉल मर्ज केला तर तुमच्या नंबरवर आलेला otp चोरला जाऊ शकतो, त्यामुळे कोणतेही अनोळखी फोन कॉस उचलताना काळजी घ्या. नंबरची खात्री करूनच कॉल उचला. जर तुम्हाला अशा कोणत्या नंबरवरती संशय आहे किंवा तुम्ही एखाद्या हॅकरचा शिकार झाल असाल तर 155260 या  हेल्पलाइन नंबर वर तक्रार नोंदवू शकता.