हिरो मोटोकॉर्पचा मोठा निर्णय; 1 जुलैपासून वाहनांच्या किंमती बदलणार

हिरो मोटोकॉर्पने आपल्या मोटारसायकल्स आणि स्कूटर्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Jun 23, 2021, 03:53 PM IST
हिरो मोटोकॉर्पचा मोठा निर्णय; 1 जुलैपासून वाहनांच्या किंमती बदलणार title=

मुंबई : हिरो मोटोकॉर्पने आपल्या मोटारसायकल्स आणि स्कूटर्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या मोटारसायकल्सच्या  किंमती 1 जुलैपासून 3 हजार रुपयांनी वाढणार आहे.

कंपनीने म्हटले आहे की, कच्चा माल आणि किंमतींमध्ये सलग होत असलेल्या भाववाढीमुळे मोटारसायकल्सच्या किंमती वाढवणे गरजेचे झाले आहे. वाढलेल्या किंमती मॉडेल आणि बाजाराप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतील.

किंमती वाढवणे आवश्यक

हिरो मोटोकॉर्पने मंगळवारी स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, 'कमोडिटीच्या किंमती सलग वाढत आहेत, त्याकरीता कंपनीच्या प्रोडक्टच्या किंमतींमध्ये वाढ करणे आवश्यक झाले आहे.'

ऑटो कंपन्यांची परिस्थिती बिकट
कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतींमुळे नुकतेच कार कंपन्यांनी किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटामुळे ऑटो कंपन्यांची परिस्थिती अशीही बिकट झाली आहे. त्यातच कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतींमुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढत आहे. हिरो मोटोकॉर्पने 24 मे रोजी आपल्या कारखान्यांमध्ये उत्पादन पुन्हा सुरू केले होते. कंपनीचे कारखाने गुरूग्राम. धारूहेरा आणि हरिद्वारमध्ये आहेत.