जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, पाच जणांना वाचवण्यात यश

जम्मू -काश्मीर येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे.  

Updated: Jan 14, 2020, 04:41 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, पाच जणांना वाचवण्यात यश title=

जम्मू -काश्मीर : येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. गेल्या ४८ तासांत उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील काही भागात हिमस्खलन झाले. गांदरबल  जिल्ह्यातही बर्फवृष्टी झाली. या बर्फाखाली दबून तीन जवान शहीद झाले. तर एक जवान अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान लष्कराने या ठिकाणी बचावकार्य सुरू केले आहे. अनेक जवानांना बर्फाखालून बाहेर काढण्यात आले आहे. पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे.

बर्फवृष्टीमुळे उत्तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. काश्मीरमधील गांदरबल जिह्यात सोनमर्गच्या गग्गेनेर भागाजवळ कुलान गावात हिमस्खलन झाले. बर्फाखाली दबलेल्या पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. आहे. अन्य बेपत्ता लोकांचा तपास सुरू आहे.

दरम्यान, थंडीचं प्रमाणही वाढले आहे. पावसाचे पाणी रस्त्यांवर साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली आहे. थंडी आणि पावसामुळे येथील जनजीवनावर मोठा परिणाम दिसून येत आहे.