राजस्थानमध्ये पावसाचा कहर, पुराची स्थिती

राजस्थानमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये तर पुराचं थैमान पाहायला मिळतं आहे. पुराची काही ठिकाणी स्थिती समोर आली आहे. पुराच्या पाण्यानं हाहाकार माजवला आहे.

Updated: Jul 2, 2017, 10:53 AM IST
राजस्थानमध्ये पावसाचा कहर, पुराची स्थिती title=

जयपूर : राजस्थानमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये तर पुराचं थैमान पाहायला मिळतं आहे. पुराची काही ठिकाणी स्थिती समोर आली आहे. पुराच्या पाण्यानं हाहाकार माजवला आहे.

पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे तलावासारखी स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. पूराच्या पाण्यात नागरिक आणि वाहनं वाहून गेली आहेत.