कोरोना संकटात 'ही' बॅंक घरापर्यंत आणणार एटीएम व्हॅन

 19 शहरांमध्ये मोबाइल एटीएम उपलब्ध

Updated: Apr 26, 2021, 08:13 AM IST
कोरोना संकटात 'ही' बॅंक घरापर्यंत आणणार एटीएम व्हॅन title=

नवी दिल्ली : कोरोनाचा(COVID19) वाढता संसर्ग पाहता देशातील विविध भागात लॉकडाउन (Lockdown) आणि कडक निर्बंध लागू झाले आहेत. दरम्यान खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेने (HDFC Bank) 19 शहरांमध्ये मोबाइल एटीएम उपलब्ध केले आहेत. मोबाईल एटीएमच्या सुविधेमुळे सामान्य लोकांना रोख रक्कम काढण्यासाठी आपल्या परिसराबाहेर जावे लागणार नाही असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले. मोबाइल एटीएमचा वापर करून ग्राहक 15 प्रकारचे व्यवहार करु शकतील.

या शहरांमध्ये मोबाइल एटीएम सुविधा उपलब्ध असणार आहे. 19 मोठ्या शहरांमध्ये एटीएम व्हॅन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात मुंबई(Mumbai), चेन्न (Chennai), हैदराबाद, पुण(Pune), लखन (Lucknow), दिल्ल(Delhi), लुधियाना अशा 19 शहरांचा समावेश आहे.

ज्या शहरांवर कोरोनाचा फार वाईट परिणाम झालाय त्याच ठिकाणी बँकेची ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मोबाइल एटीएमच्या सुविधेमुळे सामान्य लोकांना रोख रक्कम काढण्यासाठी आपल्या परिसराबाहेर जावे लागणार नाही. कंटेनमेंट झोनमध्ये लोकांना रोख रकमेची गरज भासल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूची दुसरी लाट देशासाठी संकट बनली आहे. मोठ्या संख्येने कोरोना संसर्गाच्या घटनांमुळे रुग्ण बेडसाठी संघर्ष करत आहेत, तर औषधांचीही कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात आहेत. परिस्थिती अशी आहे की गेल्या 24 तासांत देशात दर मिनिटाला 243 नवीन रुग्णांची वाढ होत आहे.

भारतात गेल्या 24 तासात

प्रति मिनिटाला 243 लोकांना संसर्ग
सरासरी दर मिनिटाला 1.9 मृत्यू
प्रति मिनिटाला 1,194 लोकांची चाचणी
तीन दिवसांत 10 लाखाहून अधिक रुग्ण

गेल्या तीन दिवसांत देशात कोरोना संसर्गाची प्रकरणं 10 लाखांवर गेली आहेत. काही महिन्यांपूर्वी 10 लाख रुग्ण वाढण्यासाठी 65 दिवसांचा कालावधी लागला हता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिली लाट आली असतानाही, दहा लाखांचा आकडा गाठण्यासाठी 11 दिवस लागले होते.