Corona : भारतात दर मिनिटाला 243 नव्या रुग्णांची वाढ, तर इतक्या जणांचा मृत्यू

भारतात इतक्या झपाट्याने होतेय कोरोना रुग्णांची वाढ

Updated: Apr 25, 2021, 10:05 PM IST
Corona : भारतात दर मिनिटाला 243 नव्या रुग्णांची वाढ, तर इतक्या जणांचा मृत्यू title=

मुंबई : कोरोना विषाणूची दुसरी लाट देशासाठी संकट बनली आहे. मोठ्या संख्येने कोरोना संसर्गाच्या घटनांमुळे रुग्ण बेडसाठी संघर्ष करत आहेत, तर औषधांचीही कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात आहेत. परिस्थिती अशी आहे की गेल्या 24 तासांत देशात दर मिनिटाला 243 नवीन रुग्णांची वाढ होत आहे.

भारतात गेल्या 24 तासात
प्रति मिनिटाला 243 लोकांना संसर्ग
सरासरी दर मिनिटाला 1.9 मृत्यू
प्रति मिनिटाला 1,194 लोकांची चाचणी
तीन दिवसांत 10 लाखाहून अधिक रुग्ण

गेल्या तीन दिवसांत देशात कोरोना संसर्गाची प्रकरणं 10 लाखांवर गेली आहेत. काही महिन्यांपूर्वी 10 लाख रुग्ण वाढण्यासाठी 65 दिवसांचा कालावधी लागला हता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिली लाट आली असतानाही, दहा लाखांचा आकडा गाठण्यासाठी 11 दिवस लागले होते.

गेल्या 19 दिवसांपासून देशात कोरोना संसर्गाची रोज एक लाखाहून अधिक प्रकरण वाढत आहेत. ही मालिका 6 एप्रिलपासून सुरू आहे.

फेब्रुवारीच्या मध्याला जेव्हा दररोज वाढणारी संख्या खाली आली, तेव्हा भारतातील कोरोनाची सक्रिय प्रकरणे जवळपास 1.3 लाखांच्या जवळपास होती. गेल्या दोन महिन्यांत त्यात 15 पट वाढ झाली आहे. आता 26 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. या कारणास्तव, रुग्णालयांवर ताण वाढला आहे आणि ऑक्सिजनसाठी प्रचंड मागणी ही वाढली आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळनंतर सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत.

1 फेब्रुवारी, 1.6 लाख
1 मार्च, 1.65 लाख
1 एप्रिल, 6.10 लाख
25 एप्रिल, 26.8 लाख
भारतात जगातील 40 टक्के रुग्ण

24 एप्रिल रोजी भारतात 3.46 लाख रुग्णांची नोंद झाली. जगभरातील एकूण प्रकरणांपैकी हे प्रमाण 40 टक्के होते. दुसर्‍या लाटेमुळे देशात कोरोना संक्रमणाच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यापासून कोरोनाच्या जागतिक प्रकरणात भारताचा सहभाग जवळपास 30 टक्के होता.

देशामध्ये कोरोना संसर्गाची त्सुनामी आली असावी, परंतु इतर देशांच्या तुलनेत भारतात चाचणी कमी आहे. आतापर्यंत अमेरिकेतील 10 टक्के आणि ब्राझीलच्या 6.7 टक्के जनतेला कोरोनाची लागण झाली आहे, तर भारतातील केवळ 1.21 टक्के लोकांना कोरोना झाल्याचं पुढे आलं आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लसीकरण मोहिमेला भारताने वेग देणे आवश्यक आहे. आतापर्यंत देशात 14 कोटीहून अधिक लोकांना लसी देण्यात आल्या असून त्यापैकी 2.2 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लसीकरणाच्या आकडेवारीच्या संदर्भात अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, परंतु लोकसंख्यानुसार भारत खूपच मागे आहे.

प्रमुख देशांच्या लोकसंख्येची लसीकरण स्थिती

देश - पहिला डोस - दुसरा डोस

इस्त्राईल, 62.11 टक्के, 57.85 टक्के

अमेरिका, 41.03 टक्के, 27.26 टक्के

ब्रिटन, 49.36 टक्के, 17.78 टक्के

जर्मनी, 22.64 टक्के, 6.99 टक्के

ब्राझील, 12.42 टक्के, 5.04 टक्के

भारत, 8.47 टक्के, 1.55 टक्के