गुरमीतनंतर स्वयंघोषित 'देवीचा अवतार' राधे माँ अडचणीत

स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' गुरमीत राम रहीम याच्यानंतर आता स्वत:ला देवीचा अवतार म्हणवणारी राधे माँच्या अडचणी वाढल्यात.

Updated: Sep 5, 2017, 07:10 PM IST
गुरमीतनंतर स्वयंघोषित 'देवीचा अवतार' राधे माँ अडचणीत title=

चंदीगड : स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' गुरमीत राम रहीम याच्यानंतर आता स्वत:ला देवीचा अवतार म्हणवणारी राधे माँच्या अडचणी वाढल्यात.

पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयानं राधे माँ विरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं पोलिसांना राधे माँविरुद्ध केस दाखल करण्याचे आदेश दिलेत.

फगवाडाचे रहिवासी सुरिंदर मित्तल यांनी ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणात राधे माँ हिला दोन वर्षांपूर्वी पंजाब पोलिसांनी चौकशीसाठी समन्सही बजावले होते. सुरिंदरनं ऑगस्ट २०१५ मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 

राधे माँ सतत वैतागवाणे व्हॉटसअप मॅसेज आणि कॉल्स करत होती, असा सुरिंदर यांचा आरोप आहे. आपलं रेकॉर्डेड संभाषणही सुरिंदर यांनी पोलिसांत दिलंय.