Saudi Arabia Hawai Chappal Viral Video: तुम्ही फोटोमध्ये पाहताय ती चप्पल आपल्यापैकी अनेकांना माहितीच आहे. अगदी घरगुती कामांसाठी किंवा काहीच नाही तर टॉयलेटसाठी वापरली जाणारी ही चप्पल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कारण ही चप्पल एका स्टोअरमध्ये तब्बल 1 लाख रुपयांना विकली गेली आहे.
सऊदी अरबमधील एका स्टोअरमध्ये 'ट्रेंडी चप्पल' म्हणून 1 लाख रुपयांच्या किंमतीला विकली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने भारतात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण भारतात अगदी टॉयलेटसाठी वापरही जाणारी ही हवाई चप्पल कुवैतच्या एका स्टोअरमध्ये तब्बल लाख रुपयांना मिळत आहे. जी चप्पल भारतात अवघ्या 50 ते 100 रुपयांमध्ये मिळते.
या चप्पलना इंस्टाग्राम अकाउंटवर "ट्रेंडी सँडल" म्हटले गेले होते. ज्याची किंमत 4590 सौदी रियाल म्हणजे भारतीय चलनानुसार अंदाजे रु. 1,02,240 लावली होती. लाल, पिवळा, निळा आणि हिरवा यासह विविध रंगांमध्ये तयार केलेल्या सर्व जोड्या एका काचेच्या पेटीत ठेवल्या होत्या. लोक म्हणतात की ,या त्याच चप्पल आहेत ज्या सहसा टॉयलेटला जाताना घालतात.
We Indians use these sandals as a toilet footwear pic.twitter.com/7EtWY27tDT
— Rishi Bagree (@rishibagree) July 16, 2024
एक कर्मचारी काचेच्या केसमधून चप्पल काढून व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला दाखवताना दिसला. हा व्हिडिओ kuwaitinside या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 4 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि यावर नेटिझन्सची विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
एका यूजरने लिहिले आहे की, ' आम्ही आयुष्यभर टॉयलेटसाठी चक्क 4500 रियाल किंमतीची चप्पल वापरत आहोत', तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'भारतात आम्ही या बाथरूममध्ये घालतो, आम्ही 60 रुपयांना खरेदी करतो'. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने 'हे प्रत्येक भारतीय आईचे आवडते हत्यार आहे' असे विनोदीपणे लिहिले आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की 'हे खरोखरच मदर्स डेसाठी सर्वोत्तम गिफ्ट आहे.' सर्व मातांसाठी सर्वोत्तम शस्त्र. माझ्या आईची चप्पल माझ्यासाठी सर्वोत्तम होती.