Hathras Case: सीबीआयचे चारही आरोपींवर आरोपपत्र, सामूहिक बलात्कार आणि हत्याचा आरोप

उत्तर प्रदेश (Utter Pradesh) हाथरस (Hathras) येथे १९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी (rape and murder charges) सीबीआयने चार आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल (CBI files chargesheet) केले आहे.  

Updated: Dec 18, 2020, 05:14 PM IST
Hathras Case: सीबीआयचे चारही आरोपींवर आरोपपत्र, सामूहिक बलात्कार आणि हत्याचा आरोप  title=

लखनऊ : उत्तर प्रदेश (Utter Pradesh) हाथरस (Hathras) येथे १९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी (rape and murder charges) सीबीआयने चार आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल (CBI files chargesheet) केले आहे. आधार म्हणून सीबीआयने आपल्या आरोपपत्रात पीडितेचे शेवटचा जबाब ग्राह्य धरला आहे. आरोपींच्या वकिलांनी कोर्टाबाहेर पत्रकारांना सांगितले की, केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्येचे आरोप केले आहेत आणि हाथरस येथील स्थानिक न्यायालयाने दखल घेतली आहे.

घाईघाईने शेवटचे संस्कार केले

१९ वर्षांच्या पीडित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी हाथरस येथे चार जणांनी बलात्कार केला होता. उपचारादरम्यान पीडितेचा २९ सप्टेंबर २०२० रोजी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर ३० सप्टेंबरच्या रात्री तिच्या घराजवळील रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांवर प्रश्न उपस्थित 

स्थानिक पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव आणला असल्याचा आरोप या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'अंत्यसंस्कार कुटूंबाच्या इच्छेनुसार करण्यात आले.'

चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत

अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपास यंत्रणेने न्यायालयीन कोठडीत असलेले या प्रकरणातील आरोपी संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांच्या भूमिकेकडे पाहिले आहे. आरोपींचे विविध फॉरेन्सिक तपास गुजरातमधील गांधीनगर येथील प्रयोगशाळेत केले गेले आहेत. सीबीआयच्या तपास करणाऱ्यांनी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांचीही भेट घेतली. सामूहिक बलात्काराच्या कथित घटनेनंतर पीडितेला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

योगी सरकारला मोठी टीका

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारला या प्रकरणावर व्यापक टीकेला सामोरे जावे लागले. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयने घटनेच्या चौकशीसाठी एक पथक स्थापन केले आणि तपासणीचे काम त्याच्या गाझियाबाद (यूपी) युनिटकडे सोपवले. या पथकाने पीडितेच्या कुटूंबाच्या सदस्यांची विधाने नोंदविली आहेत.