हरियाणा : आपल्या मावस बहिणीची गोळी मारुन हत्या (Sister Murder) करणाऱ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. हरियाणातल्या सोनीपतमध्ये (Haryana, Sonipat) एक धक्कादायक घटना उघडकीस आली. सोनीपतमध्ये राहाणार विशाल उर्फ गुल्लू खांडा या तरुणाने आपल्या मित्राकडून बंदूक (Pistol) आणली होती. स्टाईल मारण्यासाठी त्याने बंदूक आणल्याचं बोललं जातंय. बंदूक घेऊन तो आपल्या मावस बहिणीबरोबर मस्करी करत होता. बंदूक कशी चालवतात हे दाखवताना तो तिला घाबरवत होता. पण त्याचवेळी अचानक बंदूकीचा ट्रिगर दाबला गेला आणि गोळी मावस बहिणीच्या छातीत लागली.
गोळी लागल्याने बहिण गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात उपचाराधीच तिचा मृत्यू झाला होता. बहिणीची हत्या करण्याचा त्याचा कोणताही इरादा नव्हता. हे सर्व प्रकरण केवळ अचानक घडलं. पण पोलिसांनी मृत मुलीच्या भावाला अखेर अटक करण्यात आलं आहे. तर मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आला.
मृत मुलीचं नाव खुशबू असं असून ती 19 वर्षांची होती. विशाल आणि रोहिणी हे नेहमी एकमेकांची मस्करी करायचे. घटनेच्या दिवशीही विशालने बंदूक घेऊन रोहिणीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. तसंच तिला बंदूक कशी चालवायची हे देखील सांगत होता. पण दुर्देवाने त्याच्या हातातून बंदुकीचा ट्रीगर दाबला गेला आणि रोहिणीच्या छातीत गोळी लागली. रोहिणीच्या कुटुंबियांनी विशालविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विशालला अटक केली. बहिणीला जाणूनबुजून मारलं नसल्याचं विशालने सांगितलं.
आठवीच्या विद्यार्थ्यांनी केली हत्या
दरम्यान, आठवीच्या विद्यार्थ्यांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमध्ये उघडकीस आली आहे. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांबरोबर मिळून एका तरुणाची चाकूने वार करत हत्या केली. तरुणाचा भाचा या शाळेत शिकत होता. त्याला काही विद्यार्थ्यांकडून त्रास दिला जात होता. याची तक्रार करण्यासाठी हा तरुण शाळेत आला होता. त्रिलोक असं मृत तरुणाचं नाव होतं.
त्रिलोकने भाच्याला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांची तक्रार प्राध्यापकांकडे केली. त्यानंतर तो शाळेतून घरी परतत होता. त्याचवेळी आठवीतल्या मुलांनी त्याला रस्त्यात गाठत त्याला तक्रार का केली याजा जाब विचारला. यावरुन त्रिलोक आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. यावेळी अचानक एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चाकू काढत त्रिलोकच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात त्रिलोकचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन विद्यार्थ्याला अटक केली असून इतर विद्यार्थी फरार आहेत.