पॅरोलवर पॅरोल! बलात्काराचा आरोप असलेला राम रहिम सातव्यांदा जेलबाहेर... कोणाची मेहरबानी?

बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिमला पुन्हा एकदा 30 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे. रोहतकमधल्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहिमला याआधी तब्बल सहा वेळा पॅरोल देण्यात आलेला आहे. आता तो बागपतमधल्या आश्रमात राहाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 21, 2023, 01:38 PM IST
पॅरोलवर पॅरोल! बलात्काराचा आरोप असलेला राम रहिम सातव्यांदा जेलबाहेर... कोणाची मेहरबानी? title=

Ram Rahim Parole : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम (Ram Rahim) याच्यावर बलात्कार आणि हत्येचा गंभीर (Rape and Murder Case) आरोप असून सध्या तो तुरुंगात आहे. आता त्याला पुन्हा एकाद 30 दिवसांचा पॅरोल (Parol) मिळाला असून तो जेलबाहेर आला आहे. पण यावेळी त्याल डेरा मुख्यालयात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. याआधी बाबा राम रहिमला तब्बल सहा वेळा पॅरोलवर तुरुंगाबाहेर सोडण्यात आलं आहे. यामुळे हरयाणा सरकारवर (Haryana Government) प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. पॅरोल देण्याचा अधिकार राज्य सरकारचा असतो. तुरुंगात चांगला व्यवहार करणाऱ्या कैद्याला ही सुट दिली जाते. 

पण 2017 मध्ये शिक्षा सुनावल्यनंतर गुरमीत राम रहिम आतापर्यंत 6 वेळा तुरुंगाबाहेर आला आहे.  बाबा राम रहिमला दोन शिष्यांवर बलात्कार आणि हत्येच्या आरोप जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्याला सात वेळा पॅरोल देण्यात आला आहे. याआधी 21 जानेवारीला 40 दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. तेव्हा तो उत्तर प्रदेशच्या बरनावा आश्रमात राहिला होता.

पॅरोलवर प्रश्नचिन्ह
शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था अकाल तख्त आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंध समितीने बाबा राम रहिमला पॅरोल देण्यावर जोरदार विरोध केला आहे. राम रहिमचा पॅरोल रद्द करण्याची मागणी करण्यात येतेय. एकीकडे राम रहिमला नियमित पॅरोल दिला जातोय, तर दुसरीकडे 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात बंद असलेल्या शिख कैद्यांना सोडलं जात असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. राम रहिमला पॅरोल देऊन शिख समाजाचा अपमान केला जात असल्याचा आरोपही शिखांच्या धार्मिक संस्थांनी केला आहे. 

केव्हा-केव्हा मिळाला पॅरोल
24 ऑक्टोबर 2020 ला राम रहिमला पहिल्यांदा पॅरोल देण्यात आला होता. यावेळी त्याला 24 तासांसाठी ही सुट देण्यात आली होती. हा पॅरोल इतका गोपनिय ठेवण्यात आला होता की हरियाणा पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात त्याला बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर 21 मे 2021 रोजी त्याला 48 तासांचा पॅरोल देण्यात आला. आजारी आईला भेटण्यासाठी त्याला तुरुंगाबाहेर सोडण्यात आलं. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2022  मध्ये त्याला तिसऱ्यांदा 21 एकदिवसांचा पॅरोल देण्यात आला. गुरुग्राम आश्रमात त्याच्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. तर जून 2022 मध्ये तब्बल एक महिन्यासाठी त्याला पॅरोल देण्यात आला. ऑक्टोबर 2022 मध्ये बाबा राम रहिमला पाचव्यांदा तुरुंगाबाहेर सोडण्यात आलं. यावेळी त्याला 40 दिवसांचा पॅरोल मिळाला. त्यानंतर 21 जानेवारी 2023 ला सहाव्यांदा पॅरोल देण्यात आला. यावेळी देखील 40 दिवसांची सुट देण्यात आली. आता पु्न्हा एकादा म्हणजे सातव्यांदा राम रहिमला पॅरोल देण्यात आला आहे.