मुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा 'या' टिप्स

Cooking Tips : बाहेर मस्त पाऊस पडतो, मुलं घरी आहेत आणि त्यामुळे विकेंडला गरमा गरम कमी तेलकट आणि हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. 

नेहा चौधरी | Updated: Jul 21, 2023, 01:34 PM IST
मुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा 'या' टिप्स title=
cooking tips hotel style crispy onion bhaji and Oil Free Bhaji Receipe video

Cooking Tips in Marathi : बाहेर मस्त पाऊस सुरु आहे, मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी असल्याने मुलं घरी आहेत. त्यामुळे अशावेळी गरमा गरम भजी आणि मस्त चहा हा बेत तर होणारच...विकेंडचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गरमागरम, कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट भजी कशी बनावयची ते आज आम्ही सांगणार आहोत. (cooking tips hotel style crispy onion bhaji and Oil Free Bhaji Receipe video )

आजकाल प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी जागृत आहेत. त्यामुळे तेलकट पदार्थ खाण्यास ते टाळाटाळ करतात. पण वरुण राजाचा कोसळत असताना प्रत्येकाला भज्यांची आठवण तर होणाराच ना...पण कमी तेलकट अगदी हॉटेलस्टाइल भुजी कशी करायची याबद्दल खालील टिप्स तुम्ही वापरल्यास घरातील मंडळी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. 

क्रिस्पी कांदा भज्यांसाठी साहित्य 

बारीक - लांब चिरलेला कांदा

हिरवी मिरची

काश्मिरी लाल तिखट

जिरं पावडर

धणे पूड

आमचूर पावडर

ओवा

बेसन

तांदळाचं पीठ

मीठ

तेल

पाणी

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अशी बनवा भज्जी

एका बाऊलमध्ये कांद्याचे बारीक लांब काप घ्या. आता यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काश्मिरी लाल तिखट, जिरं पावडर, धणे पूड, आमचूर पावडर आणि ओवा घाला. आता त्यात 1 कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा. कांद्याला पाणी सुटत असल्याने पाणी घालू नका. गरज पडल्यास फक्त पाणी शिंपडा.आता ही भजी तळून घ्या. 

हे लक्षात ठेवा

भजी तळण्यासाठी जाड तळाचं भांडं वापरा. त्यामुळे तेलाचे तापमान स्थिर राहतं आणि भजी जास्त तेल शोषून घेत नाही. जर तेल नीट गरम झालं नाही तर भजी जास्त तेल शोषून घेतं.

त्याशिवाय तुम्ही ऑईल फ्री कांदा भजीचीदेखील बनवू शकता. त्याठी भजी बेक किंवा एअर फ्राय करा.