रेल्वे - ट्रक एकमेकांना धडकले, रेल्वे चालक ठार

उत्तरप्रदेशमध्ये भीषण दुर्घटना घडलीय. हापूरमधल्या पिलखुआ इथं ट्रेनने ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय. 

Updated: Mar 3, 2018, 10:53 AM IST
रेल्वे - ट्रक एकमेकांना धडकले, रेल्वे चालक ठार  title=

हापूर, उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशमध्ये भीषण दुर्घटना घडलीय. हापूरमधल्या पिलखुआ इथं ट्रेनने ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय. 

मुरादाबादहून संबळमार्गे हातियाकडे जाणाऱ्या या ट्रेनने ट्रकला धडक दिल्याने ही दुर्घटना घडलीय. 

या अपघातात ट्रेन चालक ठार झालाय... तर ट्रक चालक गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

रेल्वे फाटक खुले असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येतंय. ही दुर्घटना घडली त्यावेळी रेल्वे फाटक कर्मचारी तिथे उपस्थित नसल्याचे बोललं जात आहे. 

या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती हापूरच्या पोलीस सहअधिक्षकांनी दिलीय.