New Year 2023: नवीन वर्ष म्हणजेच २०२३ आजपासून सुरु झालंय,सर्वानी मोठ्या जल्लोषात वाजत गाजत नाव वर्षाचं स्वागत केलंय. काळ सगळीकडे घरोघरी थर्टी फर्स्ट च आयोजन केलं गेलं होतं सर्वानी मस्त पार्टी एन्जॉय करत सरत्या वर्षाला गुडबाय केलं (goodbye2022) आणि नवीन वर्षाला वेलकम (#Welcome2023) केलं.
नवीन वर्षात आपण सर्वात आधी पाहतो ते कॅलेंडर आणि त्यातही सुट्ट्या ! या वर्षी कोणकोणत्या सुट्ट्या आहेत किंवा सण कोणत्या दिवशी आले आहेत आणि त्या अनुसार आपण सुट्ट्यांचे प्लॅनिंग आखतो. (HappyNewYear2023 holiday list in new year 2023 this holidays will come on weekends) बऱ्याचदा असं होतं कि काही सण आठवड्याच्या शेवटी म्हणजे वीकेंडला येतात आणि त्याच्या मिळणाऱ्या हक्काच्या सुट्ट्या वाया जातात म्हणजे ज्यांना शनिवार रविवार कामावर सुट्टी असते अश्यांची पंचाईत होते. यावर्षीसुद्धा अगदी तसाच झालं आहे बरेच सण हे नेमके वीकेंडच्या तोंडावर आले आहेत त्यामुळे तुमचे बरेच सुट्ट्या वाया जातील असं म्म्हणायला हरकत नाही. चला तर पाहुयात या वर्षीच्या सुट्ट्या.
नवीन वर्षाची सुरवात होते मकर संक्रांत (Makar Sankranti 2023 Date) या सणाने . यावर्षी संक्रांत १४ जानेवारी ला शनिवारी येतेय आणि त्याला जोडून पोंगल हा सण सुद्धा शनिवारीच येत आहे,त्यामुळे एक सुट्टी कमी झाली आहे . त्यामुळे वर्षाच्या सुरवातीलाच तुमची एक सुट्टी कमी झालीये .
2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्र आलेली आहे आणि यावर्षी शनिवारी हा सण आलेला आहे त्यामुळे शनिवारी सुट्टी असणाऱ्यांची महाशिवरात्रीची सुट्टी वाया वाजणार आहे . मात्र ज्यांना विकेंड सोडून सुट्टी आहे अश्याना या सुट्टीचा फायदा मिळू शकतो .
२०२३ मध्ये २२ एप्रिल ला ईद आहे आणि याही दिवशी शनिवार आहे त्यामुळे फाईव्ह डे वर्किंग असणाऱ्यांसाठी हा देखील सुट्टीचा बेत फसणार आहे .
दिवाळी सण सर्वात मोठा सण . पण यावर्षी दिवाळी येतेय नेमकी रविवारी, त्यामुळे दिवाळीच्या इतर सुट्ट्यांमध्ये एक दिवस कमी होणार आहे तो लक्षात ठेऊनच प्लॅनिंग आखा.
दिवाळी नंतर उत्तर भारतात साजरा केला जाणारा छठपूजा हा सण यावर्षी रविवारी आहे त्यामुळे ही सुट्टीसुद्धा वाया गेली.