Happy Birthday Ratan Tata : रतन टाटा; श्रीमंतीचा आकडा इतका कमी असूनही मनानं राजा असणारा माणूस

Happy Birthday Ratan Tata : (Indian business industry) भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देत त्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावणाऱ्या मंडळींमध्ये एका व्यक्तीचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं. 

Updated: Dec 28, 2022, 08:11 AM IST
Happy Birthday Ratan Tata : रतन टाटा; श्रीमंतीचा आकडा इतका कमी असूनही मनानं राजा असणारा माणूस  title=
Happy Birthday Ratan Tata as he turns 85 today know his net worth

Happy Birthday Ratan Tata : (Indian business industry) भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देत त्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही (Indian Economy) हातभार लावणाऱ्या मंडळींमध्ये एका व्यक्तीचं नाव निर्विवादपणे घेतलं जातं. हे नाव म्हणजे टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा. वयाचा आकडा वाढला असला तरीही या माणसाच्या मनाचं तारुण्य मात्र आजही 16 वर्षांच्या मुलाला लाजवेल असं आहे. सानथोरांमध्ये रमणाऱ्या, सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणाऱ्या आणि त्यांच्यासाठी पुढाकारानं अनेक उपक्रम राबवणाऱ्या (Ratan tata Birthday) रतन टाटा यांचा आज 85 वा वाढदिवस. प्रत्येक क्षेत्रातून, प्रत्येकजण या खऱ्याखुऱ्या सँटाक्लॉजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. (Happy Birthday Ratan Tata as he turns 85 today know his net worth)

(Business news) व्यावसायिक, उद्योजक, एक उत्कृष्ट अभियंता, सर्वोत्तम Boss आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्वं अशी त्यांची ओळख. 28 डिसेंबर 1937 मध्ये मुंबईत नवल टाटा आणि सूनी टाटा यांच्या कुटुंबात (Ratan tata family) त्यांचा जन्म झाला. काळ पुढे गेला, रतन टाटा मोठे झाले आणि 1962 मध्ये त्यांनी टाटा समुहासोबत (Tata Group of industries) जमशेदपूर येथे असणाऱ्या टाटा स्टील डिव्हीजन येथे नोकरीला सुरुवात केली. 1991 मध्ये याच उद्योगसमुहाच्या अध्यपदी (Chairman) ते विराजमान झाले.  

रतन टाटा यांच्या संपत्तीचा आकडा किती? (ratan tata net worth)

मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार रतन टाटा यांच्याकडे असणाऱ्या एकूण संपत्तीची रक्कम सुमारे 3500 कोटी रुपये इतकी आहे. देशातील 433 वे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. इतकी वर्षे उल्लेखनीय कामगिरी करूनही आणि उद्योग क्षेत्रात अनेक विभागांत सक्रिय असूनही टाटा यांची संपत्ती इतकी कमी कशी? हाच प्रश्न तुम्हाला पडतोय ना? तर, समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे हे जाणत टाटा यांनी अनेक समाजोपयोगी कामांमध्ये हातभार लावला, मोठ्या प्रमाणात दान केलं. अनेक धर्मदाय संस्थांना आर्थिक पाठबळ देत रतन टाटा यांनी एक वेगळ्या प्रकारची श्रीमंती जपली आणि हीच श्रीमंती त्यांना सर्वांच्या पुढे ठेवते असं म्हणायला हरकत नाही. 

हेसुद्धा वाचा : Ratan Tata Birthday : रीच मनाचा रॉयल माणूस! Ratan Tata यांच्याविषयीच्या 'या' गोष्टी सर्वांनाच प्रेरणा देतील

समाजासाठी कायम उभा राहिलाय टाटा समूह (ratan tata charity work)

जमशेदजी टाटा यांचे सुपुत्र रतनजी टाटा यांनी धर्मदाय संस्था आणि समाजोपयोगी कामंसाठी दान करण्याची मुहूर्तमेढ रोवली. आजच्या घडीला गरजवंतांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्यांमध्ये टाटा समूह हा देशातील सर्वात जुना आणि सर्वात मानाचा उद्योग समूह मानला जातो. रतन टाटा यांचंही यात मोलाचं योगदान. त्यांच्याच कारकिर्दीत भारतामध्ये आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेत देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं.