हनीप्रीतला जेलमध्ये होतोय 'हा' त्रास

राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत सध्या अंबाला जेलमध्ये कैद आहे. यावेळी महिला आयोगाकडे तिने आपल्या होणाऱ्या तक्रारींचा पाढा वाचला आहे.

Updated: Dec 30, 2017, 09:09 AM IST
हनीप्रीतला जेलमध्ये होतोय 'हा' त्रास  title=

नवी दिल्ली : राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत सध्या अंबाला जेलमध्ये कैद आहे. यावेळी महिला आयोगाकडे तिने आपल्या होणाऱ्या तक्रारींचा पाढा वाचला आहे.

तिने जेल प्रशासनावर गंभीर आरोप करत नातेवाईकांना भेटू दिले जात नसल्याचे म्हटले आहे. 

फोनची सुविधा 

राज्य महिला आयोगाच्या सदस्या नम्रता गोड यांच्यासमोर हनीप्रीतने तक्रारींचा पाढा वाचला. हनीप्रीतने जेल प्रशासनाकडे २ मोबाईल नंबर व्हेरीफिकेशनला दिले होते.

पण त्यांचे व्हेरीफिकेशन न झाल्याने ती कोणाच्या संपर्कात राहू शकत नाही. 
  
महिला आयोगाच्या उपाध्यक्षा प्रिती भारद्वाज आणि सदस्या नम्रता गौड जेल निरीक्षणासाठी गेल्या होत्या. हनीप्रीतला फोनची सुविधा देण्यासंबधी दोघींनी आश्वासन दिले.

पत्र नाही  

खाते खोलण्यासाठी तिने कोणते पत्र जेल प्रशासनाला लिहिले नसल्याचे महिला आयोगातर्फे सांगण्यात आले. या व्यतिरिक्त हनीप्रीतला जेलमध्ये कोणता त्रास नसल्याचेही  सांगितले. 

देशद्रोहाची केस

हनीप्रीतवर देशद्रोहाची केस दाखल करण्यात आली आहे. २५ ऑगस्ट ला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर दंगल भडकविण्याचा तिच्यावर आरोप आहे.