जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत सरकारने वाढवली

वार्षिक व्यवसाय दीड कोटी पर्यंत करणाऱ्या व्यावसायिकांना जुलै-सप्टेंबर दरम्यानचा विक्री कर रिटर्न आता १० जानेवारी पर्यंत भरता येणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 30, 2017, 07:57 AM IST
जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत सरकारने वाढवली  title=

नवी दिल्ली : सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत अंतिम विक्री रिटर्न म्हणजेच जीएसटीआर-१ दाखल करण्याची सिमामर्यादा दहा दिवसांनी वाढविली आहे. १० जानेवारी २०१८ पर्यंत जीएसटी रिटर्न भरता येणार आहे. 

वार्षिक व्यवसाय दीड कोटी पर्यंत करणाऱ्या व्यावसायिकांना जुलै-सप्टेंबर दरम्यानचा विक्री कर रिटर्न आता १० जानेवारी पर्यंत भरता येणार आहे.

याआधी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ही मुदत देण्यात आली होती. 

१० जानेवारी २०१८ पर्यंत 

दिड कोटींपेक्षा अधिक वार्षिक व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांना जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत फायनल रिटर्न म्हणजेच जीएसटीआर-१ देखील १० जानेवारी २०१८ पर्यंत भरता येणार आहे. 
  
याचसोबत व्यावसायिकांना डिसेंबर महिन्यातील रिटर्न १० फेब्रुवारी पर्यंत भरता येणार आहे.पुढच्या महिन्यासाठी त्यानंतरच्या महिन्याची १० तारीख असणार आहे. 

तिमाही आधारावर 

जीएसटी परिषदने जीड कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नोव्हेंबर महिन्यात त्यांचे फायनल रिटर्न तिमाही आधारावर भरण्याची अनुमती दिली होती.

त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानचा रिटर्न १५ फेब्रुवारी आणि जानेवारी ते मार्च मधील जीएसटीआर-१ ३० एप्रिल पर्यंत भरता येणार आहे.