गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी

मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 6, 2017, 07:57 PM IST
गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी title=

मुंबई : मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.

अशीच एक आक्षेपार्ह प्रतिक्रिया @nikhildadhich या अकाऊंटवरून निखिल दधीच या व्यक्तीनं दिली. 'एक कुतिया कुत्ते की मौत क्या मरी सारे पिल्ले एक सुर में बिलबिला रहे है' अशा अत्यंत खालच्या दर्जाच्या शब्दांत या व्यक्तीनं प्रतिक्रिया व्यक्त केली होती... अशा प्रतिक्रियांचा अनेक जणांनी तीव्र शब्दांत निषेध केलाय.


निखिल दधीच याचं आक्षेपार्ह ट्विट 

परंतु, धक्कादायक गोष्ट म्हणजे असं आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या या व्यक्तीला खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत आहेत. मोदी ट्विटरवर सध्या केवळ 1,779 जणांना फॉलो करत आहेत. त्यापैंकीच निखील दधीच हा एक आहे.


पंतप्रधान करतात फॉलो

'उद्योजक | वस्त्र निर्माता | हिंदू राष्ट्रवादी | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फॉलो करून माझा सन्मान केलाय' असा उल्लेख आपली ओळख करून देताना त्यानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर केलाय.

यावरही सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात... आप नेते संजय सिंह यांनी 'गौरी लंकेश यांच्या हत्येवर मोदी भक्तांचं आक्षेपार्ह ट्विट पाहा, देशाचे पंतप्रधान याला फॉलो करतात' असं ट्विट केलंय.